Home /News /entertainment /

विराट कोहलीला ‘कॉमेडी नाईट..’ पाहणं पडलं होतं महागात; लाखोंचा बसला होता भूर्दंड

विराट कोहलीला ‘कॉमेडी नाईट..’ पाहणं पडलं होतं महागात; लाखोंचा बसला होता भूर्दंड

‘द कपिल शर्मा शो’ (the kapil sharma show) चा भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहली (virat kohli ) सुद्धा फॅन आहे. विराटचा एक जुना व्हिडिओ पुढे आला असून यामध्ये विराट एक मजेशीर किस्सा शेअर करताना दिसत आहे.

  मुंबई, 22 जानेवारी-   लोकांना टेंशन फ्री करून खळखळून हसायला भाग पाडणाऱ्या देशातील हास्यसम्राटांमध्ये कपिल शर्माचं नाव सर्वात आघाडीवर आहे. आपल्या अफलातून हजरजबाबीपणामुळे कपिल लोकांना पोट धरून हसायला भाग पाडतो. त्यामुळेच जगभरात ‘द कपिल शर्मा शो’चे  (the kapil sharma show) लाखो चाहते आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल पण कपिलच्या या विनोदांचा भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहली (virat kohli ) सुद्धा फॅन आहे. विराटचा एक जुना व्हिडिओ पुढे आला असून यामध्ये विराट एक मजेशीर किस्सा शेअर करताना दिसत आहे. कपिल शर्मा शो पाहणं महागात विराट कोहलीचा एक खूप जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये कपिल शर्मासोबत एक घटना शेअर करताना विराट सांगतो की, “एकदा आम्ही विमानतळावर वाट पाहत होतो. मला कंटाळा आला होता त्यामुळे विचार केला की चला काहीतरी पाहुयात. पण माझं वायफाय सुरू नाही याच्याकडे माझं लक्षच नव्हतं. मी भारतातील 3G सेल्युलर नेटवर्कवरच सर्फिंग सुरू केलं. एक तास मी आंतरराष्ट्रीय रोमिंगवर कपिल शर्मा शो पाहिला. तेवढ्यात माझ्या भावाचा फोन आला. त्यानं विचारलं काय करतोयस तू? मी म्हटलं विमानतळावर वाट पाहतोय. यावर भाऊ म्हणाला की मग हे तीन लाख रुपयांचं कसलं बिल आलंय.” कोहलीचा हा किस्सा ऐकून सगळे चकित होतात आणि हसू लागतात.
  विराटच्या व्हायरल होत असणाऱ्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. काही चाहत्यांना एवढं बिल कसं काय आले ? याबाबत आश्चर्यही वाटत आहे. कारण ‘कॉमेडी नाईट विथ कपिल’ हा शो पाहणे कपिलला तीन लाख रुपयांना पडले आहे. यावर काही चाहत्यांनी आंतरराष्ट्रीय रोमिंग बाबत माहिती देऊन संभ्रम दूर करण्याचा प्रयत्नही केला आहे. वाचा-'हिच्यापेक्षा तर दीपिका चांगली....', Katrina Kaif एअरपोर्ट लुकमुळे होतेय ट्रोल विराटचा जुना व्हिडिओ व्हायरल विराटचा हा खूप जुना व्हिडिओ आहे. दरम्यान, कपिल शर्मा आपल्या नव्या प्रोजेक्टमुळेच चर्चेत आहे. काही दिवसानंतर कपिल नेटफ्लिक्सवर स्टँडअप कॉमेडी करताना दिसणार आहे. या शो चे नाव Kapil Sharma: I'm Not Done Yet असे आहे. तर विराट कोहली सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. भारतीच्या कसोटी क्रिकेट संघाचा राजीनामा दिल्यामुळे विराट सध्या चर्चेत आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood News, Cricket news, Entertainment, The kapil sharma show, Virat kohali

  पुढील बातम्या