मुंबई, 05 जानेवारी : सध्या सर्वत्र चर्चा आहे ती टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्या जन्माला येणाऱ्या बाळाची. काही महिन्यांपूर्वी त्यांनी ट्वीट करुन त्यांची गोड बातमी साऱ्या जगाला सांगितली. प्रेगंन्सीच्या (Pregancy) काळात अनुष्का शर्मा आणि विराट कोहली दोघंही अनुष्काच्या फिटनेसकडे (Fitness) विशेष लक्ष देत आहेत. काही दिवसांपूर्वी विराट अनुष्काकडून शीर्षासन करुन घेत आहे असा फोटो व्हायरल झाला होता. आता अनुष्काचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
काय आहे या व्हायरल व्हिडीओमध्ये?
अनुष्का शर्माच्या एका फॅनपेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये गर्भवती असलेली अनुष्का शर्मा ट्रेड मीलवर व्यायाम करताना दिसत आहे. अनुष्का शर्माच्या चेहऱ्यावर छान तेज आलेलं दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी तिच्या फिटनेसचं कौतुक करत आहेत.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी अनुष्कानं VOGUE INDIA साठी बोल्ड फोटोशूट केलं होतं. या फॅशन आणि लाइफस्टाईल मॅगझिनच्या जानेवारी 2021 च्या एडिशनसाठी हे फोटोशूट केलं होतं. ज्यामध्ये अनुष्का आपलं बेबी बंप दाखवताना दिसत होती. बोल्ड लूकमध्ये ती दिसते आहे. हे फोटो पाहून स्वतःही या फोटोच्या प्रेमात पडली होती. Capturing this for myself , for life ! असं कॅप्शन तिनं या फोटोला दिलं होतं.
View this post on Instagram
अनुष्काच्या या बोल्ड फोटोशूटवर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या होत्या. काहींनी या फोटोंचं कौतुक केलं होतं तर काहींनी तिच्यावर टीकादेखील केली होती.