मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Virat-Anushkaच्या आलिशान घराचं सुझैन खान कनेक्शन; अलिबाग बंगल्याचं सिक्रेट रिव्हील

Virat-Anushkaच्या आलिशान घराचं सुझैन खान कनेक्शन; अलिबाग बंगल्याचं सिक्रेट रिव्हील

विराट अनुष्का अलिबाग घर

विराट अनुष्का अलिबाग घर

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या अलिबागमधील घराचं सिक्रेट समोर आलं आहे. ऋतिकच्या एक्स वाइफचा महत्त्वाचा संबंध आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 25 नोव्हेंबर : क्रिकेटर विराट कोहली त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. वेळ मिळेल तसा तो अनुष्का आणि लेक वामिकाबरोबर क्वालिटी टाइम स्पेंड करत असतो.  अनुष्का आणि विराट नेहमीच लाइमलाइटमध्ये असतात. दोघांच्या लग्झरियस लाइफची खूप चर्चा असते. बायको आणि मुलीला घेऊन विराट नेहमी व्हेकेशनलाही जात असतो.  नुकताच विराट कोहली आणि अनुष्काच्या नव्या घराचे फोटो समोर आले आहेत.  विराटनं अलिबागमध्ये आलिशान बंगला भाड्यानं घेतला आहे. मुंबईत मोठा फ्लॅट असताना अलिबागमध्ये बंगला भाड्यानं घेतल्यानं अनेक उलट सुलट चर्चा सुरू आहेत. अशातच अनुष्का आणि विराटच्या घरासंबंधीत ऋतिक रोशन कनेक्शन समोर आलं आहे. केवळ ऋतिक नाही तर ऋतिकची एक्स वाइफ सुजैनचाही याच्याशी महत्त्वाचा संबंध आहे.

विराट आणि अनुष्का यांनी अलिबागमध्ये एक आलिशान बंगला भाड्यानं घेतला आहे. विराटनं संपूर्ण घराची थीम ही व्हाइट कलरची ठेवली आहे. घराच्या लिविंग एरिआपासून सिटिंग एरिआपर्यंत संपूर्ण खर फारच सुंदर आहे. अलिबागमध्ये अगदी समुद्राजवळ दोघांनी घर खरेदी केलं आहे. घरात मोकळी आणि खेळती हवा आहे. त्याचप्रमाणे बालकनी एरिआ देखील फार सुंदररित्या सजवण्यात आला आहे. संपूर्ण घराला पूर्णपणे मॉर्डन टच देण्यात आला आहे. घरात आणि घराच्या बाहेर सुंदर हिरवळ पाहायला मिळते.

हेही वाचा - Fatima Sana Sheikh: फातिमा सना शेख लवकरच करणार लग्न? 'त्या' पोस्टमुळे चर्चेला उधाण

Architecture Digest ने सोशल मीडियावर विराटच्या घराचे काही इनसाइट फोटो शेअर केले आहेत. आलिशान घराला आर्टफुल प्रिंट्ससह मॉर्डन टच देण्यात आला आहे. या घराशी ऋतिक रोशनची एक्स वाइफ सुझैनचा जवळचा संबंध आहे. विराट आणि अनुष्काचं घर आकर्षक आणि सुंदररित्या सजवण्यात सुझैनचा मोठा हात आहे.  विराटच्या अलिबागमधील या घराचं संपूर्ण डिझाइन हे ऋतिकची एक्स वाइफ सुझैन खान हिनं केलं आहे असं म्हटलं जात आहे.  हे घर विराटनं या वर्षी गणपतीमध्ये घेतल्याचं सांगितलं जातंय. घराचं काही काम अजूनही सुरू आहे. घराचं महिन्याचं भाडं हे 2.76 लाख रूपये असल्याचं म्हटलं जात आहे.

अनुष्का आणि विराट आपापल्या कामात बिझी आहेत. अनुष्काच्या चकदा एक्सप्रेस या सिनेमाचं शुटींग काही दिवसांआधीच पूर्ण झालं आहे.  2018नंतर झिरो नंतर अनुष्का जवळपास 4 वर्षांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. क्रिकेटर झूलन गोस्वामी यांच्या आयुष्यावर हा सिनेमा आधारित आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News, Virat kohli