Home /News /entertainment /

....म्हणून सैफ अली खानपासून विराटपर्यंत या सेलिब्रिटींनी घेतली Paternity Leave

....म्हणून सैफ अली खानपासून विराटपर्यंत या सेलिब्रिटींनी घेतली Paternity Leave

बाळाच्या जन्मानंतर जशी आईला मॅटर्निटी लिव्ह मिळते तशीच वडिलांनाही सुट्टी मिळण्याची तरतूद आहे. बाळाचा आणि वडिलांचं नातं मजबूत होण्यासाठी Paternity Leave फायद्याची असते.

  मुंबई, 19 डिसेंबर: विराट कोहली (Virat Kolhi) आणि अनुष्का शर्माच्या (Anushka Sharma) घरी लवकरच एका छोटा पाहुणा येणार आहे. पुढच्या महिन्यातच अनुष्का बाळाला जन्म देणार आहे. अशा वेळी स्रीला सर्वात जास्त गरज बाळाच्या बाबांची असते. त्यामुळे विराट कोहलीने पॅटर्निटी लिव्ह (Paternity Leave) घेण्याचा निर्णय घेतला आहे. बाळासाठी सुट्टी घेणारा विराट हा पहिलाच सेलिब्रिटी नाही. या आधी शाहीद कपूरनेही बाळाच्या जन्माच्या वेळी Paternity Leave घेतली होती. Paternity Leave म्हणजे काय? डिलिव्हरी झाल्यानंतर पुरुषांना पत्नी आणि मुलाची काळजी घेण्यासाठी जी सुट्टी मिळते त्याला Paternity Leave असं म्हणतात. पुरुष 15 दिवसांपासून 6 महिन्यांपर्यंत Paternity Leave घेऊ शकतात. या काळात त्यांना भरपगारी रजा मिळते. महिलांना बाळाच्या जन्माच्या वेळी 6 महिने मॅटर्निटी लिव्ह दिली जाते. Paternity Leave चे अनेक फायदे आहेत. स्वीडनमधील एका अभ्यासानुसार, असं समोर आलं आहे की, महिलादेखील वडिलांनी पितृत्व रजा घेतल्यामुळे जास्त आनंदी राहतात. अभ्यासावरून असे दिसून आलं आहे की पितृत्व रजेच्या सहाय्याने पुरुष आपल्या मुलांसमवेत वेळ घालवू शकतात आणि बंध तयार होतो. प्रसूतीची रजा घेतल्यानंतर पुरुष केवळ त्यांच्या जोडीदाराची काळजी घेतात असं नाही तर घरातील कामातही मदत करतात. यामुळे जोडप्यांमधील नातंदेखील मजबूत होतं आणि दोघेही एकत्रितपणे आपल्या मुलाची काळजी घेतात. लहान वयातच मुले आपल्या वडिलांसोबत वेळ घालवण्यास सुरुवात करतात यामुळे त्यांना बरेच फायदे मिळतात. मुलं शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या बळकट होते.
  View this post on Instagram

  A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

  मुलाच्या बौद्धिक विकासाला मदत होते. असं मानलं जातं की जन्मापासूनच आपल्या वडिलांसोबत जास्त वेळ घालविणारी मुले आपल्या सामाजिक जीवनात चांगली असतात आणि त्यांची बुद्ध्यांक पातळीदेखील चांगली असते.
  बॉलिवूड सेलिब्रिटी घेतात Paternity Leave आजपर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी Paternity Leave घेतली आहे. शाहिद कपूर, सैफ अली खान, राज कुंद्रा, कुणाल खेमू आणि अभिनेत्री ईशा देओलच्या पतीनेही अशी सुट्टी घेतली होती.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Pregnancy, Virat anushka

  पुढील बातम्या