मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Virat Kohli Daughter Vamika first picture : ....अशी दिसते अनुष्काची लेक वामिका, बाबा विराटला चेअर करताना कॅमेऱ्यात कैद

Virat Kohli Daughter Vamika first picture : ....अशी दिसते अनुष्काची लेक वामिका, बाबा विराटला चेअर करताना कॅमेऱ्यात कैद

virat kohli and anushka sharma daughter vamika first picture : विराट आणि अनुष्काच्या लेकीची पहिली झलक समोर आली आहे. बाबा विराटला चेअर करताना दिसली वामिका.

virat kohli and anushka sharma daughter vamika first picture : विराट आणि अनुष्काच्या लेकीची पहिली झलक समोर आली आहे. बाबा विराटला चेअर करताना दिसली वामिका.

virat kohli and anushka sharma daughter vamika first picture : विराट आणि अनुष्काच्या लेकीची पहिली झलक समोर आली आहे. बाबा विराटला चेअर करताना दिसली वामिका.

मुंबई, 23 जानेवारी- भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीला (virat kohli ) चेअर म्हणजे प्रोत्साहन देण्यासाठी पत्नी अनुष्का शर्मा केपटाऊन पोहचली आहे. केपटाऊनमध्ये भारत आणि दक्षिण अफ्रिकाच्या संघामध्ये शेवटचा सामना खेळला जात आहे. यावेळी अनुष्काने मुलगी वामिकाला कडेवर घेतली होते. विशेष म्हणजे वामिका देखील आपल्या बाबाला चेअर करतान दिसली. वामिकाचा हा क्यूट फोटो सोशल मीडियावर ( Virat Kohli Daughter Vamika first picture) व्हायरल होत आहे. यामध्ये वामिकाचा क्यूटनेस एकदम ओव्हरलोड असाच आहे. पहिल्यांदा वामिका अशी टीव्हीवर दिसली आहे. आजपर्यंत वामिकाचा चेहरा कोणी पाहिलेला नाही. पहिल्यांदा ती अशी कॅमेऱ्यासमोर आली आहे.

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये अनुष्का काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे. तर मुलगी वामिका पिंक रंगाच्या फ्रॉकमध्ये खूपच क्यूट दिसत आहे. तिच्या केसांची छानशी लाल रंगाच्या रिबिनने पोनीटेल बांधली आहे. या फोटोत ती खूपच क्यूट दिसत आहे. काही दिवसापूर्वीच अनुष्का आणि विराटने मुलगी वामिकाचे फोटो किंवा व्हिडिओ न केल्याबद्दल मीडिया आमि पापाराझींचे आभार मानले होते. नुकताच वामिकाचा पाहिला वाढदिवस झाला आहे. या वाढदिवसाचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

विराट कोहली आणि अनुष्का शर्माने सुरूवातीपासून मुलगी वामिकाचा फोटो शेअर केलेला नाही. शिवाय त्यांनी मीडियाला देखील तशीच विनंती केली आहे. सध्या दोघेही मुलगी वामिकाला सोशल मीडियापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतात.

केपटाऊनमध्ये होत असलेल्या तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुलनं (KL Rahul) टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियात या सामन्यात 4 बदल करण्यात आले आहेत. आर. अश्निन, शार्दूल ठाकूर, भुवनेश्वर कुमार आणि व्यंकटेश अय्यर यांना वगळण्यात आले असून त्यांच्या जागी सूर्यकुमार यादव, जयंत यादव, प्रसिद्ध कृष्णा आणि दीपक चहरचा समावेश करण्यात आला आहे.

First published:

Tags: Bollywood News, Crime news, Entertainment, Virat kohli, Virat kohli and anushka sharma