मुंबई, 22 मार्च- बॉलिवूड
(Bollywood) अभिनेत्री अनुष्का शर्मा
(Anushka Sharma) आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली
(Virat Kohali) सर्वात लोकप्रिय सेलिब्रेटी कपल्सपैकी एक आहेत. या दोघांचा मोठा चाहतावर्ग आहे. हे दोघेही नेहमीच कपल्स गोल देत असतात. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लग्नाआधी जवळपास 3 वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर डिसेंबर 2017 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली होती. दोघेही त्यांच्या लव्ह लाईफबद्दल फारच कमी बोलतात. मात्र विराटने त्याच्या एका मुलाखतीत अनुष्का शर्मासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला होता.
विराट कोहलीने ग्रॅहम बेन्सिंगरच्या 'इन डेप्थ विथ ग्रॅहम बेन्सिंगर या शोमध्ये संवाद साधताना सांगितले होते की, 2013 मध्ये एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान त्याची अनुष्काशी भेट झाली होती. क्रिकेटपटूने सांगितले होते की तो सेटवर फारच नर्व्हस होता आणि भेटल्यानंतर लगेचच अनुष्कासोबत एक विनोद केला होता, जी अजिबात चांगली गोष्ट नाहीय.
विराटसाठी तो क्षण खूप विचित्र होता. तो क्षण आठवून विराट म्हणाला, 'ती आत गेली. ती माझ्यापेक्षा उंच दिसत होती. मी म्हणालो, 'तुम्हाला यापेक्षा उंच हिल्स नाहीत का?' यांनतर तिला कदाचित म्हणायचं होतं, 'एक्सक्यूज मी?' मी लगेच पुढे म्हणालो, 'मी फक्त गंमत करत आहे!'विराट पुढे म्हणाला, 'माझा विनोद माझ्यासाठी खरोखरच विचित्र क्षण बनला होता. खरं सांगायचं तर मी मुर्खासारखं वागलो.’ परंतु नंतर आमच्यामध्ये काय घडलं हे वेगळं सांगायला नको. 2014 मध्ये या दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती.
(हे वाचा:जॉनने 27 वर्षांपासून खाल्ली नाही आवडीची मिठाई, 18 वर्षात घेतल्या केवळ 3 सुट्ट्या )
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने 2017 मध्ये जवळच्या लोकांच्या उपस्थितीत इटलीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. त्यांनतर अनुष्का आणि विराट कोहली सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. अनुष्का विराटच्या प्रत्येक सामन्यादरम्यान त्याला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असते. सध्या अनुष्का आणि विराट एका लेकीचे आईबाबा आहेत. त्यांच्या मुलीचं नाव वामिका असं आहे. या दोघांनी नेहमीच आपल्या मुलीला कॅमेऱ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.