मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /विराट की अनुष्का; कुणासारखी दिसते विरुष्काची लेक? काकानं शेअर केला PHOTO

विराट की अनुष्का; कुणासारखी दिसते विरुष्काची लेक? काकानं शेअर केला PHOTO

विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या मुलीची एक झलक  (Virushka blessed with baby girl) पाहण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक होता.

विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या मुलीची एक झलक (Virushka blessed with baby girl) पाहण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक होता.

विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या मुलीची एक झलक (Virushka blessed with baby girl) पाहण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक होता.

नवी दिल्ली, 11 जानेवारी :  भारताचा कॅप्टन विराट कोहली (Virat kohali) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (anushka sharma)  या सेलेब्रिटी कपलच्या घरात एक छोटी पाहुणी आली आहे. अनुष्काने एका गोंडस मुलीला जन्म दिल्याची गोड बातमी विराट कोहलीनं (Virushka blessed with baby girl) गूड न्यूज दिली आहे. तेव्हापासून विरुष्काच्या छोट्या परीची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या मुलीचा पहिला फोटो व्हायरल होतो आहे. विराटचा भाऊ विकास कोहलीनं आपल्या इन्स्टाग्रामवर चिमुकल्या पावलांचा फोटो पोस्ट केल आहे. हा फोटो विरुष्काच्या मुलीचाच असावा, असा अंदाज बांधला जातो आहे.

View this post on Instagram

A post shared by Vikas Kohli (@vk0681)

भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतला महत्त्वाचा सामना ड्रॉ झाला, त्याच वेळी भारतीय कप्तानाच्या घरी मुलीने जन्म घेतला. सोमवारी दुपारीच अनुष्काने मुलीला जन्म दिला. बाळ-बाळंतीण सुखरूप असल्याचं विराटने कळवलं आहे. "आम्हाला जाहीर करण्यात प्रचंड आनंद होतो आहे. आम्हाला मुलगी झाली आहे. आमच्या आयुष्यातलं नवं पर्व सुरू झालं आहे. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि प्रेमाबद्दल आभारी आहे. पण या क्षणी आमचं खासगीपण जपण्याच्या अधिकाराचा आपण सगळे मान राखाल", अशा शब्दांत विराट कोहलीने Instagram पोस्टमध्ये भावना व्यक्त केल्या आहेत.

हे वाचा - पत्नी मीरा राजपूतने व्यक्त केली ही इच्छा : शाहिदने सोशल मीडियावर मागितली मदत

विराट कोहली, अनुष्का शर्मा भारतातील सर्वात जास्त चर्चेत असणारं जोडपं आहे. लवकरच आई वडील होणार हे या दोघांनी जाहीर केलं, तेव्हापासून या दोघांच्या होणाऱ्या बाळाची चर्चा होती. विरुष्काने हे जाहीर केलं तेव्हा खरं तक देशात Coronavirus आणि लॉकडाऊनची भीती होती. तरीही सोशल मीडियावर सर्वांत ट्रेंड होणारा विषय हाच होता.

हे वाचा - Big B ना मेसेज पाठवून त्रास देणारा हा कथित 'अजय देवगण' अखेर सापडला

अनुष्का शर्माने गरोदरपणाचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. नुकतंच अनुष्का शर्माने एका मॅगझिनसाठी फोटोशूटही केलं आहे. त्याचे फोटो अजूनही चर्चेचा विषय ठरलेले आहेत. या फोटोंमध्ये ती आपले बेबी बंप (Baby Bump) फ्लॉन्ट करताना दिसली. त्यावरून तिचं कौतुक झालं आणि टीकाही झाली.

First published:
top videos

    Tags: Anushka sharma, Bollywood, Bollywood actress, Virat kohali