विरुष्काच्या रिसेप्शन पत्रिकेत पर्यावरण रक्षणाचा संदेश

विरुष्काच्या रिसेप्शन पत्रिकेत पर्यावरण रक्षणाचा संदेश

विराट-अनुष्काने मित्र-मंडळींसाठी 21 डिसेंबरला दिल्लीत तर 26 डिसेंबरला मुंबईत ग्रँड रिसेप्शनचं आयोजन केलंय.

  • Share this:

15 डिसेंबर : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली आता त्यांच्या रिसेप्शनच्या जोरदार तयारीला लागलेत. विराट-अनुष्काने मित्र-मंडळींसाठी 21 डिसेंबरला दिल्लीत तर 26 डिसेंबरला मुंबईत ग्रँड रिसेप्शनचं आयोजन केलंय.

या दोघांच्या रिसेप्शनची आमंत्रण पत्रिकांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतायत. या पत्रिकेसोबत एक रोपटं पाहायला मिळतंय. या आमंत्रण पत्रिकेतून विरुष्काने पाहुण्यांना पर्यावरण रक्षणाचा अनमोल संदेश दिलाय.

सेलिब्रिटींचे फॅन्स अनेकदा त्यांचं अनुकरण करत असतात. अशा वेळी पर्यावरणासारखा संदेश देणं, कधीही चांगलं. आपल्या वैयक्तिक आयुष्यात रमताना सामाजिक भान बाळगणं हे खूप महत्त्वाचं असतं. अनुष्का-विराटनं ते अधोरेखित केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 15, 2017 03:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading