08 डिसेंबर: अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या लग्नाची चर्चा सुरु असतानाच गुरुवारी रात्री अनुष्का शर्मा आणि तिचे कुटुंबीय मुंबई एअरपोर्टवरून दिसले. अनुष्का आणि तिचे कुटुंबीय लग्नासाठी इटलीला जात असल्याची चर्चा आहे.
१२ तारखेला इटलीला अनुष्का आणि विराट विवाहबद्ध होणार असल्याची चर्चा आहे. त्यांचं लग्न इटलीत होत असल्याची चर्चा आहे. महत्त्वाचं म्हणजे अनुष्का शर्मानंतर दीपिका पदुकोणही एअरपोर्टवर आली होती. अनुष्का-विराटनी लग्नासाठी फक्त जवळचे मित्र आणि नातेवाईकांना आमंत्रित केलंय. आणि कुठलाही क्रिकेटरला लग्नासाठी आमंत्रित करण्यात आलेलं नाही. २१ डिसेंबरला दिल्लीमध्ये रिसेप्शन आयोजीत करण्यात आलंय. आणि त्यावेळी क्रिकेट आणि बॉलीवूड सेलिब्रेटजना आमंत्रित करण्यात आल्याची माहिती मिळते आहे.
त्यामुळे आता विराट-अनुष्का इटलीत विवाहबद्ध होऊन परतणार असं दिसतंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा