विराट-अनुष्काचं शुभमंगल डिसेंबरमध्ये?

सूत्रांच्या माहितीनुसार अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात लग्नाच्या बंधनात अडकू शकतात. असे संकेत सध्या ते दोघं देतात.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2017 10:49 PM IST

विराट-अनुष्काचं शुभमंगल डिसेंबरमध्ये?

24 आॅक्टोबर : विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा लवकरच त्यांच्या चाहत्यांना खूशखबर देणार असं दिसतय. सूत्रांच्या माहितीनुसार अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात लग्नाच्या बंधनात अडकू शकतात. असे संकेत सध्या ते दोघं देतात.

भारतीय क्रिकेटर विराट कोहली डिसेंबर महिन्यात श्रीलंका टूरवर जात नाहीय. तसा न जाण्याचा अर्ज त्यानं दिला आहे. या अर्जात विराटने रजेचं कारण 'वैयक्तिक' असं लिहिलं आहे. म्हणजेच काय तर विराटला डिसेंबर महिन्यात सुट्टी हवी आहे. फक्त इतकंच नाही तर अनुष्काच्या काही जवळच्या मित्रांना तिने सांगितलंय की ती डिसेंबर महिन्यात कोणतंही शूटिंग करणार नाही. त्यामुळे विराट आणि अनुष्कासाठी डिसेंबर महिना खास असल्याचं आता दिसून येतंय. आता ते या महिन्यात लग्न करणार की काय अशी चर्चा सध्या सुरू आहे.

दरम्यान मान्यवरच्या जाहिरीतीमध्ये विराट आणि अनुष्काने एकत्र काम केलं होतं. ही जाहिरात लग्नाच्या सोहळ्यांवर आधारित होती. ज्यात हे दोघेही एकमेकांना आयुष्यभराच्या साथीसाठी 7 वचनं देताना दिसले. आता हा क्षण ते सत्यात कधी अनुभवणार याचीच त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2017 04:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...