विरुष्काच्या रिसेप्शनला काय आहे स्पेशल?

11 डिसेंबरला इटलीत लग्न आणि हनिमून साजरा करून विरुष्का आता भारतात होणाऱ्या रिसेप्शनला सज्ज झालेत. आज दिल्लीत रात्री 8.30 वाजल्यापासून रिसेप्शनचा सोहळा रंगणार आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 21, 2017 04:35 PM IST

विरुष्काच्या रिसेप्शनला काय आहे स्पेशल?

21 डिसेंबर : 11 डिसेंबरला इटलीत लग्न आणि हनिमून साजरा करून विरुष्का आता भारतात होणाऱ्या रिसेप्शनला सज्ज झालेत. आज दिल्लीत रात्री 8.30 वाजल्यापासून रिसेप्शनचा सोहळा रंगणार आहे. 26 डिसेंबरला मुंबईत रिसेप्शन आहे. दोघांनी पंतप्रधानांनाही जाऊन आमंत्रण दिलंय.

कुठे आहे रिसेप्शन?

दिल्लीतलं रिसेप्शन आहे ताज डिप्लोमॅटिक अॅनक्लेवच्या दरबार हाॅलमध्ये. मुगल काळातल्या या हाॅटेलमध्ये खूप सुंदर आर्टवर्क आहे. हाॅटेलमध्ये एकूण 403 रूम्स आहेत. 41 स्वीट्स आहेत. लक्झरी स्पा आणि सलून आहे.हाॅटेलच्या आत 300 कार्स आणि हाॅटेल बाहेर 250 कार्स पार्क होऊ शकतात.

विरुष्कानं पंतप्रधानांना आमंत्रण दिलं. त्यांनी  ट्विटरवर तसा उल्लेखही केलाय. पण ही आमंत्रण पत्रिका इतकी मोठी का? तर ती आहे इको फ्रेंडली. पत्रिकेसोबत एक रोपटंही आहे.

Loading...

काय आहे मेन्यू?

हे हाॅटेल भारतीय, चायनीज आणि इटालियन फूडसाठी प्रसिद्ध आहे. पण रिसेप्शनला फोकस आहे नाॅर्थ इंडियन फूड. कारण विराट पंजाबी आहे. त्यामुळे पाहुण्यांना पंजाबी जेवण.

कोण कोण येणार?

विराट दिल्लीचा आहे. अण्डर 17पासून तिथे क्रिकेट खेळतोय. तेव्हापासूनचे सगळे क्रिकेटर लग्नाला आमंत्रित केलेत. विराट-अनुष्काच्या कुटुंबातले सगळे जण या रिसेप्शनला असतीलच. टीम इंडिया मात्र श्रीलंकेसोबत खेळतेय. त्यामुळे ती मुंबईच्या रिसेप्शनला हजर राहतील.

याशिवाय कपिल देव, आशिष नेहरा युवराज सिंह, सुरेश रैना आणि  गौतम गंभीरही येतील. तसंच इटलीचे राजदूत, कॅनडा- ब्रिटनचे हाय कमांडही लग्नाला उपस्थित राहणार आहेत.

बाॅलिवूडच्या अनेक हस्ती या रिसेप्शनला चार चांद लावतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 21, 2017 04:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...