विराट-अनुष्का येत्या तीन दिवसात अखेर होणार विवाहबद्ध,सूत्रांची माहिती

विराट-अनुष्का येत्या तीन दिवसात अखेर होणार विवाहबद्ध,सूत्रांची माहिती

सूत्राकडून असं कळतंय की दोघंही 9 ते 11 डिसेंबर दरम्यान इटलीला लग्न करतायत.

  • Share this:

06 डिसेंबर : सध्या मोसम आहे तो सेलिब्रिटींच्या लग्नाचा. झहीर खान आणि सागरिकाचं लग्न झालं. तेव्हा लग्नाला उपस्थित असलेल्या विराट आणि अनुष्काला सगळ्यांना एकच प्रश्न विचारला, आता तुमचा नंबर कधी? त्यावर त्यांनी उत्तर द्यायची टाळाटाळ केली असली तरी सूत्राकडून असं कळतंय की दोघंही 9 ते 11 डिसेंबर दरम्यान इटलीला लग्न करतायत.

हे लग्न हिंदू रिवाजाप्रमाणे होतंय. लग्नाला बाॅलिवूड आणि क्रिकेट जगतातले सेलिब्रिटीज उपस्थित राहतायत.

विराट-अनुष्का कपल म्हणून सगळीकडे खुले आम जातात. त्यांनी आपलं नातं कधी लपवून ठेवलं नाही. विश्वचषकाच्या वेळी दोघं ठरवून वेगवेगळे राहिले. अगदी ट्विटरवरही त्यांनी एकमेकांना अनफाॅलो केलं होतं. तेव्हा दोघांचं नातं तुटलं, अशी अफवाही पसरली होती.

विराटची क्रिकेटमधली कामगिरी चांगली चालली नव्हती, तेव्हा लोकांनी अनुष्काला दूषणं लावली होती. त्यावेळीही विराट तिच्या पाठी उभा राहिला आणि बोलणाऱ्यांना चार शब्द सुनावले होते.

दोघांचं एकमेकांवरचं प्रेम अतूट आहे. आणि आता या प्रेमालाच लग्नाचं कोंदण मिळणार आहे.  दोघांनाही News18लोकमतच्या शुभेच्छा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2017 05:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading