Viral Video- 'लडकी आंख मारे' गाण्यावरचा या महिलेचा डान्स पाहिलात का? हसून हसून थकाल

Viral Video- 'लडकी आंख मारे' गाण्यावरचा या महिलेचा डान्स पाहिलात का? हसून हसून थकाल

ज्या दिवशी हे गाणं प्रदर्शित झालं, त्याचदिवसापासून सिंबा सिनेमातलं हे गाणं प्रत्येकाच्या तोंडी बसलं.

  • Share this:

रणवीर सिंग आणि सारा अली खान यांच्या सिंबा सिनेमातलं लडकी आंख मारे हे गाणं तरुणाईमध्ये चांगलंच गाजलं होतं. आजही अनेक ठिकाणी हे गाणं हमखास ऐकायला मिळतं.

गेल्या वर्षी २८ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या लडकी आंख मारे गाणं हिट झालं होतं. या गाण्यावर अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री सारा अली खान थिरकले होते.

ज्या दिवशी हे गाणं प्रदर्शित झालं, त्याचदिवसापासून सिंबा सिनेमातलं हे गाणं प्रत्येकाच्या तोंडी बसलं. हे गाणं पहिल्यांदा १९९६ मध्ये तेरे मेरे सपने या सिनेमात गायलं गेलं होतं. कविता कृष्णमूर्ती आणि कुमार सानू यांनी या गाण्याला आवाज दिला होता.

२०१८ मध्ये रोहित शेट्टीने त्याच्या सिंबा सिनेमात गाण्याला नवा टच दिला. शेट्टीच्या या सिनेमात तनिष्क बागची, मीका, नेहा कक्कड आणि कुमार सानू यांनी गाणं गायलं आहे.

आता या गाण्याचा अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. फेसबुकवर ४८ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये एक महिला लडकी आंख मारे या रिमिक्स गाण्यावर थिरकताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

First published: February 7, 2019, 1:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading