S M L

सोशल मीडियावर सगळ्यांना भुरळ पाडणारी 'ही' अभिनेत्री आहे तरी कोण?

या व्हिडिओमध्ये ती मुलगी अगदी स्टाईलने तिच्याकडे पाहणाऱ्या मुलाला डोळा मारते. या दोन तरुणांच्या व्हिडिओनं सोशल मीडियावर सगळ्यांनाच वेड लावलं आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Feb 12, 2018 01:10 PM IST

सोशल मीडियावर सगळ्यांना भुरळ पाडणारी 'ही' अभिनेत्री आहे तरी कोण?

12 फेब्रुवारी : सध्या व्हॅलेन्टाइन विक जोरात सुरु आहे. गेल्या 2 दिवसांपासून सोशल मीडियावर एका मुलीचा फोटो आणि तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती मुलगी अगदी स्टाईलने तिच्याकडे पाहणाऱ्या मुलाला डोळा मारते. या दोघांच्या व्हिडिओनं सोशल मीडियावर सगळ्यांनाच वेड लावलं आहे. पण ही इतकी सुंदर मुलगी आहे तरी कोण? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

तर ही आहे प्रिया प्रकाश वारियर. ही दक्षिण भारतातली अभिनेत्री आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणार हे गाणं आहे मल्ल्याळम सिनेमा 'ओरु अदार लव्ह' मधलं. या गाण्याचे बोल आहेत 'मनिक्या मलराया पूवी'. सध्या हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय.

शिवाय प्रियाच्या काही क्यूट एक्सप्रेशन्सची चर्चा थांबता थांबत नाही आहे. तिच्या डोळ्यांच्या खूणा आणि त्यावर घायाळ होणारे अनेक जण सोशल मीडियावर गाण्याचं फारच कौतुक करतायेत. या गाण्याने बघता बघता 45 लाखांच्यावर व्ह्युज मिळवले आहेत. आता व्हॅलेन्टाइन विकचं हे हिट गाणं ट्रेन्डिंग झालं नाही तरच नवल!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 12, 2018 12:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close