VIRAL : 12 बॉलिवूड 'अभिनेत्रीं'चा हा VIDEO पाहून नाही बसणार विश्वास; रेखा आणि काजोलची कमाल तर पाहाच!

एकाच व्हिडिओत तब्बल 15 नायिकांच्या डुप्लिकेट्स अगदी खऱ्यासारख्या समोर आल्या तर? विश्वास बसणार नाही इतक्या डिट्टो कॉपी दिसणाऱ्या या डुप्लिकेट हिरोईन्स एकदा पाहाच.

News18 Lokmat | Updated On: Jul 16, 2019 09:03 PM IST

VIRAL : 12 बॉलिवूड 'अभिनेत्रीं'चा हा VIDEO पाहून नाही बसणार विश्वास; रेखा आणि काजोलची कमाल तर पाहाच!

मुंबई, 16 जुलै : सोशल मीडियावर कधी कुठली गोष्ट चालेल आणि कुठली पळेल सांगता येत नाही. सध्या फेसबुकवर आणि तिथून सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर एक व्हिडिओ धुमाकूळ घालतोय. प्रसिद्ध कलाकारांच्या नकला करण्याचे व्हिडिओ प्रसिद्ध आहेत. त्यातूनच आता टिकटॉक व्हिडिओमुळे हे काम आणखी सोपं झालं आहे.  सुप्रसिद्ध नायकांचे डुप्लिकेट्स ही गोष्ट नवी नाही. अमिताभ बच्चन यांचे तर किती तरी डुप्लिकेट्स वेगवेगळ्या कार्यक्रमातून आपली कला सादर करत असतात. पण एकाच व्हिडिओत तब्बल 12 नायिकांच्या डुप्लिकेट्स अगदी खऱ्यासारख्या समोर आल्या तर?  फेसबुकवर Duplicate Bollywood Actress 😍 Latest Version नावाच्या पेजवरचा एक व्हिडिओ देशभर कमालीचा व्हायरल झाला आहे.

रेखा, श्रीदेवी, ऐश्वर्या, माधुरी दीक्षित, करिष्मा कपूरपासून ते अगदी लेटेस्ट आलिया भट्ट, दिशा पाटनी आणि श्रद्धा कपूरपर्यंत सर्व अभिनेत्रींच्या डुप्लिकेट्स या व्हिडिओत दिसतात. त्यातली रेखा आणि श्रीदेवी तर खऱ्याच वाटाव्यात एवढ्या तंतोतंत दिसताहेत. काजोलची डुप्लिकेट पाहाल तर विश्वास बसणार नाही की, ही खरी काजोल नाही. तीच गोष्ट माधुरी आणि श्रद्धा कपूरबद्दल.

या व्हिडिओमध्ये प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोणसारख्या दिसणाऱ्या तरुणीही धमाल करतात. या सगळ्या अभिनेत्रींच्या डुप्लिकेट्सनी हा व्हिडिओ केलाय की इतर कोणी केलाय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मृत्यू तिच्या लेकरांना हातही लावू शकला नाही, कारण समोर उभी होती आई!

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bollywood
First Published: Jul 16, 2019 08:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...