मुंबई, 2 जून : सुपरहिट सिनेमा दंगलमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री झायरा वसीमनं भले बॉलिवूडला रामराम ठोकला असला तरीही मागच्या काही दिवसांपासून ती सोशल मीडियावर मात्र खूप सक्रिय आहे. देशातील सुरू असलेल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त करणारी झायरा अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. काही दिवसांपूर्वी देशात झालेल्या टोळधाडीवर तिनं हा हल्ला म्हणजे अल्लाहची प्रकोप असल्याचं मत ट्विटरवर व्यक्त केलं होतं. ज्यामुळे तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. ज्यामुळे तिनं तिचं ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंट डिलिट केलं होतं मात्र काही काळातचं तिनं पुन्हा सोशल मीडियावर कमबॅक करत आता याबाबत स्पष्टीकरण सुद्धा दिलं आहे.
कॅनडाचे पत्रकार तारिक फतेह यांच्या एका ट्वीटला उत्तर देताना झायरा वसीमनं या संपूर्ण प्रकारणावर मौन सोडलं आहे. याशिवाय आपल्या ट्वीटचा चुकीचा अर्थ काढल्याचं तिनं म्हटलं आहे. तारिक फतेह यांनी लिहिलं, 'भारतीय मुस्लीम अभिनेत्री झायरा वसीम अल्लाहच्या प्रकोपाची शिकार असं म्हणत आपल्याच देशातील लोकांची खिल्ली उडवत आहे. अशाप्रकारे तिनं टोळधाडीची व्याख्या केली आहे.'
'या' अभिनेत्रीच्या घरात कोरोनाचा शिरकाव; संपूर्ण कुटुंबाला व्हायरसची लागण
Indian Muslim actress @ZairaWasimmm mocks her own countrymen as being victims of Allah's wrath. This is how she explains locust swarms. https://t.co/vpqRcnXwbD
— Tarek Fatah (@TarekFatah) June 1, 2020
तारिक फतेह यांच्या या ट्वीटला उत्तर देताना झायरा वसीमनं एक लांबलचक नोट लिहिली आहे. या नोटमध्ये तिनं लिहिलं, 'मी या गोष्टीचा कधीच दावा केला नाही की देशाच्या काही भागात झालेली टोळधाड ही अल्लाहच्या प्रकोपाचा संकेत आहे. कोणत्याही गोष्टीला अल्लाहचा राग किंवा अभिषाप असं म्हणणं धार्मिक दृष्टीकोनातून बेजबाबदार आणि पाप आहे.'
'माझ्यासाठी प्रार्थना करा, लवकरच भेटू' वाजिद यांचा शेवटचा फोन कॉल Viral
झायरानं पुढे लिहिलं, 'माझ्या ट्वीटचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. चांगलं किंवा वाईट कोणतंही वक्तव्य असो ते माझ्या माझ्या मतांचं वास्तव मांडतं. ही मी आणि माझा देव आमच्या दोघांमधील गोष्ट आहे आणि मला कोणाला याचं स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. मी फक्त अल्लाहला उत्तर देण्यास बांधिल आहे. सध्या जग कठीण काळातून जात आहे. आधीच या ठिकाणी लोक तिरस्कार आणि कट्टरता यातून जात आहेत. अशात आपण कमीत कमी हे वाढवण्याचं काम केलं नाही तर अधिक चांगलं होईल.' आपल्या नोटच्या शेवटी झायरानं लिहिलं, मी आता अभिनेत्री नाही आहे.
https://t.co/3ZsfR3nhUK pic.twitter.com/sz8hlpFLvZ
— Zaira Wasim (@ZairaWasimmm) June 1, 2020
काही दिवसांपूर्वी झायरा वसीमनं कुरानमधील एक आयत शेअर करत लिहिलं होतं, सध्या देशाच्या काही भागात जी टोळधाड झाली आणि सध्या देशात ज्या समस्या सुरू आहेत. हे सर्व लोकांच्या वाईट कर्मांचं फळ आहे. हा अल्लाहचा प्रकोप आहे. झायराच्या या ट्वीटनंतर तिला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यात आलं होतं. काही लोकांनी तर तिची तुलना सापांशी केली होती. तर काहींनी याला इस्लामचं उदाहरण देत असं ट्वीट इस्लाममध्ये गुन्हा असल्याचं म्हटलं होतं. एका युजरनं तर कमेंटमध्ये ट्वीट करणं हा इस्लाममध्ये गुन्हा असल्याचं म्हटलं होतं.
VIDEO: वाजिद यांच्या निधनानंतर VIRAL होतंय त्यांनी हॉस्पिटलमध्ये गायलेलं हे गाणं