Fake होता रानू मंडलचा तो व्हायरल फोटो, मेकअप आर्टिस्‍टने शेअर केलं 'सत्य'

Fake होता रानू मंडलचा तो व्हायरल फोटो, मेकअप आर्टिस्‍टने शेअर केलं 'सत्य'

रानू मंडल यांचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो खोटा असल्याचं समोर आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 21 नोव्हेंबर : ‘एक प्यार का नगमा है’ या लता दीदींच्या गाण्यामुळे अचानक प्रसिद्धिच्या झोतात आलेल्या रानू मंडल पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरल्या आहेत. पण यावेळी त्यांच्या कोणत्याही नव्या गाण्यामुळे नाही तर त्या चर्चेत आल्यात त्यांच्या नव्या मेकओव्हरमुळे. सध्या रानू मंडल यांच्या मेकअपमधील एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यात त्यांनी मेकअपसेबत बरेच दागिने सुद्धा घातले आहेत. पण या मेकअप आणि दागिन्यांमुळेच रानू मंडल सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला रानू मंडल यांचा खूपच जास्त मेकअप केलेला हा फोटो एका ब्यूटी इव्हेंटमधील असल्याचं बोललं जात होतं. या फोटोमध्ये रानू यांनी डिझायनर कपडे घातले होते. याशिवाय यामध्ये त्यांचा मेकअप सुद्धा खूप जास्त केला होता. रानू यांच्या हा अवतार पाहून अनेकजण सोशल मीडियावर रानू मंडल यांची खिल्ली उडवली. खास करुन ट्विटरवर त्याच्या या लुकवर अनेक मीम्स शेअर केले जात आहेत. याशिवाय त्यांच्या सोबत बॉलिवूडचा प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर हिमेश रेशमिया आणि त्यांच्या मेकअप आर्टिस्ट सुद्धा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहेत.

बहुचर्चित TANHAJI सिनेमावर वादाचं सावट, ट्विटरवर जितेंद्र आव्हाडांनी दिली धमकी

दरम्यान आता रानू मंडल यांचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो खोटा असल्याचं समोर आलं आहे. रानू यांच्या मेकअप आर्टीस्टनं रानू यांचा ओरिजिनल फोटो सोशल त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी रानू यांचा खूप मेकअपवाला सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो हा फोटोशॉप्ड केलेला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

गर्लफ्रेंडसाठी अर्जुन रामपालनं पत्नीला दिला घटस्फोट, 21 वर्षांचा संसार मोडला

काही दिवसांपूर्वी रानू मंडल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात रानू मंडल त्यांच्यासोब सेल्फी घेण्यासाठी उत्सुक होती मात्र रानू मंडल यांनी तिला नकार देत तिच्याशी रागानं बोलताना दिसल्या. त्यांच्या हा व्हिडीओ व्हायरल होऊन काही काळ लोटला नाही तोवर त्यांच्याशी बोलायला आलेल्या पत्रकार आणि पॅपराजींनाही त्या टाळताना दिसल्या. त्याचं हे वागणं पाहता त्यांना आतापर्यंत मिळालेल्या यशाचा गर्व झाल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

सलमानच्या वडीलांशी लग्न करुनही हेलन कधीही होऊ शकल्या नाही ‘आई’

===========================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bollywood
First Published: Nov 21, 2019 06:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading