लतादीदींचं गाणं गातेय ही 2 वर्षांची चिमुरडी, रानू मंडल यांनाही टाकलं मागे!

लतादीदींचं गाणं गातेय ही 2 वर्षांची चिमुरडी, रानू मंडल यांनाही टाकलं मागे!

या मुलीचं नाव आहे प्रज्ञा मेधा. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 03 डिसेंबर : हल्ली सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. अनेक जण आपले व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर शेअर करतात आणि बघबघता तो व्हिडिओ हीट होऊन जातो. अलीकडे रानू मंडल यांचा व्हिडिओ असाच व्हायरल झाला होता. आज रानू मंडल रातोरात स्टार झाल्या आहे. रानू यांनी लता मंगेशकर यांचं गाणं गाऊन सर्वांची वाहवाह मिळवली होती. आता आणखी एक असाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पण, हा व्हिडिओ आहे अवघ्या 2 वर्षांच्या मुलीचा..

 

View this post on Instagram

 

#Musicon #lagjagale #latamangeshkarji #babygirl

A post shared by Pragya Medha (@pragyamedha11) on

ही 2 वर्षांचा मुलगी लता मंगेशकर यांनी गायलेलं प्रसिद्ध गान 'लग जा गले'(Lag Ja Gale) गात आहे. हे गाणं 1964 मध्ये आलेल्या वो कौन थी  (Wo Kaun Thi) या चित्रपटातील आहे. या मुलीचं नाव आहे प्रज्ञा मेधा. या चिमुरडीने अत्यंत सुमधूर आवाजात हे गाणं गायलं आहे.

रानाघाट स्टेशनवर गाणं गात असतानाचा रानू मंडल यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. रानू मंडल यांनी लतादीदींचं गाणं गायलं होतं. त्यानंतर प्रसिद्ध संगीतकार हिमेश रेशमिया याने आपल्या आगामी चित्रपट 'हैप्‍पी हर्डी और हीर' मध्ये सुद्धा रानू यांच्याकडून गाणं म्हणून घेतलं.

परंतु, गेल्या काही दिवसांपासून रानू या काही कारणांमुळे वादात अडकल्या आहे. अलीकडेच एका इव्हेंटमध्ये रानू या स्टेजवरच गाणं विसरल्या होत्या.

First published: December 3, 2019, 8:19 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading