Coronavirus दरम्यान व्हायरल होतेय ही शॉर्टफिल्म, पाहिल्यावर भीतीनं उडेल थरकाप

अवघ्या 5 मिनिटांची ही शॉर्टफिल्म सर्वांनाच हदरवून टाकेल अशी आहे.

अवघ्या 5 मिनिटांची ही शॉर्टफिल्म सर्वांनाच हदरवून टाकेल अशी आहे.

  • Share this:
    मुंबई, 15 मार्च : सध्या जगभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) नं थैमान घातलं आहे. देशभरात या व्हायरसमुळे 2 बळी गेले आहे. तर महाराष्ट्रात या व्हायरसची लागण झालेले सर्वाधिक 32 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सगळीकडेच भीतीचं वातावरण आहे. प्रत्येक देशानं या व्हायरसपासून वाचण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. फण तरीही या व्हायरसमुळे दगावणाऱ्यांची संख्या काही कमी झालेली नाही. पण अशातच सोशल मीडियावर मात्र एक शॉर्टफिल्म सतत व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही एक हॉरर शॉर्टफिल्म आहे. ज्यात एका महिलेला एका विचित्र व्हायरसचं संक्रमण झालेलं दाखवण्यात आलं आहे. अवघ्या 5 मिनिटांची ही शॉर्टफिल्म सर्वांनाच हदरवून टाकेल अशी आहे. ट्रायपोफोबिया असं या शॉर्टफिल्मचं नाव आहे. ही शॉर्टफिल्म जवळपास 2 वर्षांपूर्वी युट्यूबवर अपलोड करण्यात आली होती. पण कोरोना व्हायरसचं संक्रमण वाढल्यानंतर ही शॉर्टफिल्म पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कोरोना’मुळे सुहाना खान घरातच बंदिस्त, बाहेर पडता येत नसल्यामुळे कोसळलं रडू या शॉर्टफिल्ममध्ये दाखवण्यात आलं आहे की, एक महिला पब्लिक टॉयलेटमध्ये जाते, यावेळीच तिचा फोन डस्टबिनमध्ये पडतो. त्यानंतर ती तो फोन शोधायला लागते. पण या सर्वांत डस्टबिनधील एक इंजेक्शन सिरिंज तिच्या हातात घुसते. ती महिला निडल काढून फेकते. पण त्यामुळे तिला एका खतरनाक व्हायरसची लागण होते. व्हायरसची लागण झाल्यावर ती महिला तिच्या फोनवर या व्हायरसबद्दल सर्च करते. त्यावरुन तिला समजतं की तिला जीवघेण्या आजाराची जागण झाली आहे. त्यानंतर ती महिला यातून सुकटा करून घेण्याचा प्रत्येक प्रयत्न करते. मात्र यात तिला यश मिळत नाही. SHOCKING! लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या या सेलिब्रेटींनी तिसऱ्याच व्यक्तीशी केलं लग्न फोटोग्राफर्सना पाहून मलायकानं केला असा इशारा, सोशल मीडियावर Video ची चर्चा
    First published: