लग्नानंतर 3 महिन्यांनी राखी सावंतनं शेअर केला तिच्या मुलीचा VIDEO, म्हणाली...

लग्नानंतर 3 महिन्यांनी राखी सावंतनं शेअर केला तिच्या मुलीचा VIDEO, म्हणाली...

मागच्या काही काळापासून राखीच्या लग्नाचा मुद्धा सोशल मीडियावरील सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा आहे.

  • Share this:

मुंबई, 17 नोव्हेंबर : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. विशेषतः तिनं केलीली वक्तव्य आणि सोशल मीडिया पोस्टमुळे ती सतत चर्चेत राहते. मागच्या काही काळापासून राखीच्या लग्नाचा मुद्धा सोशल मीडियावरील सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा आहे. राखीला अनेकादा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे ट्रोल सुद्धा होते. मात्र तिला याचा काही फरक पडत नाही. तिनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून ज्यात ती तिच्या मुलीसाठी सर्वांचे आशीर्वाद मागत आहे.

राखी सावंतनं तिच्या इन्स्टाग्रामवर एका लहान मुलीचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि ती आपली मुलगी असल्याचं राखीचं म्हणणं आहे. हा व्हिडीओ शेअर करताना राखीनं लिहिलं, ‘फॅन्स ही माझी मुलगी आहे. तिला तुमचे आशीर्वाद द्या’ या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी राखी सावंत तिची आई असल्याचं सांगताना दिसत आहे.

बॉलिवूडचे 'हे' टॉप सेलिब्रेटी आहेत शुद्ध शाकाहारी!

 

View this post on Instagram

 

Dosto my fans a meri beti Hai please give her your Ashirwad thanks 🙏

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत असून यावर युजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. काहींनी राखीचा हा व्हिडीओ विनोदी अंदाजात घेतलं असलं तर काहींनी मात्र यावरुन राखीला ट्रोल केल आहे.

काही दिवसांरपूर्वी राखीनं तिच्या इन्स्टाग्रामवर ब्रायडल लुकमधील काही फोटो शेअर करत तिचं लग्न झाल्याचं सांगितलं होतं. मात्र तिच्या पतीचा एकही फोटो तिनं अद्याप शेअर केलेला नाही. ज्यामुळे सर्वांनाच तिच्या पतीला पाहण्याची आतुरता आहे. मात्र माझ्या पतीला मीडिया समोर यायला आवडत नाही त्यामुळे तो योग्य वेळीच सर्वांच्या समोर येईल असं राखीचं म्हणणं आहे. राखीचा पती युके बेस्ड बिझनेसमन असून ती त्याच्यासोबत खूप खूश असल्याचंही सांगते.

सोनाक्षीनंतर आता तापसीही फेल, कुंभमेळ्याशी संबंधित प्रश्नासाठी घेतली लाइफलाइन

वयाच्या 54 व्या वर्षीही किंग खान दिसतो तरुण, हे आहे फिटनेसचं रहस्य!

===============================================================

Published by: Megha Jethe
First published: November 17, 2019, 9:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading