सुशांत सिंह राजपूतची कार्बन कॉपी आहे हा तरुण, विश्वास बसत नाही तर पाहा PHOTO

सुशांत सिंह राजपूतची कार्बन कॉपी आहे हा तरुण, विश्वास बसत नाही तर पाहा PHOTO

सुशांत सारख्या दिसणाऱ्या एका तरुणानं सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

  • Share this:

मुंबई, 8 जुलै : सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला आता बरेच दिवस उलटून गेले आहेत. दरम्यानच्या काळात त्याच्या आत्महत्येसंदर्भात त्याचे कुटुंबीय, जवळच्या व्यक्ती आणि बॉलिवूडमधील इतर अनेक सेलिब्रेटींची चौकशी करण्यात आली. मात्र या तपासात फारशी काही प्रगती दिसून आली नाही. सुशांत नेमकं कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान सोशल मीडियावर सुशांतचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. अशात सुशांत सारखा दिसणाऱ्या एका तरुणानं सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

सुशांतच्या निधनानंतर त्याचे असे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले जे यापूर्वी आपण कधीच पाहिले नव्हते. पण आता हुबेहूब सुशांत सारख्या दिसणाऱ्या या तरुणानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या तरुणाचे काही व्हिडिओ आणि फोटो सध्या खूप व्हायरल होताना दिसत आहेत. जे पाहिल्यावर सर्वजण हैराण झाले आहेत. कारण हा तरुण अगदी सुशांतची कार्बन कॉपी दिसत आहे. सचिन तिवारी नावाच्या या तरुणाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sachin Tiwari (@officialtiwarisachin) on

हे वाचा-आणखी एका Tiktok स्टारची आत्महत्या, चाहत्यांना बसला धक्का

सचिन तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असून त्याचे इन्स्टाग्रामवर 10 हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. सचिनचे फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यावर अनेकांना सुशांतची आठवण येत आहे. अनेकांनी त्याच्या फोटोवर कमेंट करताना सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे तर अनेकांनी सुशांत सारखा दुसरा कोणी असूच शकत नाही तो अद्वितीय असल्याचं म्हटलं आहे.

एखाद्या बॉलिवूड कलाकाराला सारखीच हुबेहूब दुसरी व्यक्ती सापडण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी सुद्धा ऐश्वर्या राय बच्चन, शाहरुख खान, अक्षय कुमार, कतरिना कैफ याच्या सारख्या दिसणाऱ्या व्यक्ती सुद्धा खूप चर्चेत राहिल्या होत्या.

संपादन- मेघा जेठे

Published by: Kranti Kanetkar
First published: July 8, 2020, 11:42 AM IST

ताज्या बातम्या