मुंबई, 01 एप्रिल : चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसनं सध्या जगात थैमान घातलं आहे. हजारो लोकांचा हा व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अगदी सामान्य माणसांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सर्वांनाच या व्हायरसनं जखडलं आहे. पण या व्हायरसमुळे एक प्रसिद्ध अभिनेत्याचा अवघ्या दोन दिवसात मृत्यू झाला आहे. स्टार वॉर या सिनेमाचे अभिनेते अँड्रू जॅक यांचं दोन दिवसांपूर्वी निधन झालं असून आता त्याची माहिती समोर आली आहे.
अभिनेता अँड्रू जॅक हे 76 वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूच्या दोन दिवस अगोदरच ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजलं होतं. हिंदूस्तान टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार कोरोना व्हायरसमुळे ब्रिटनमध्ये अँड्रू यांचा मृत्यू झाला. अभिनेता आणि डायलेक्ट कोच असलेल्या अँड्रू यांचा एजंट जिल मॅक्लिफनं दिलेल्या माहितीनुसार अँड्रू यांचं मंगळवारी Surrey मधील एका हॉस्पिटलमध्ये निधन झालं.
SALUTE! अक्षय कुमार ते लता मंगेशकर ‘या’ सेलिब्रेटींनी कोरोनाग्रस्तांना केली मदत
मॅक्लिफनं सांगितलं, अँड्रू मागच्या काही काळापासून टेम्स मधील सर्वात जुन्या हाउसबोटमध्ये राहत होते. ते कोणावरही अवलंबून नव्हते. ते स्वतःची सर्व काम स्वतः करत होते. त्यांचं त्यांच्या बायकोवर खूप प्रेम होतं. एक अभिनेता असण्यासोबत ते डायलेक्ट कोच सुद्धा होते. जॅक यांनी स्टार वॉर सीरिजमध्ये काम केलं होतं.
अक्षय-कार्तिकनंतर आता विकी कौशलनंही PM-Cares फंडमध्ये दान केली मोठी रक्कम
अँड्रू यांच्या निधनानंतर ऑस्ट्रेलियामध्ये होम क्वारंटाईन असलेल्या त्यांच्या पत्नीनं एक इमेशनल पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिलं, 'अँड्रू जॅक यांनी दोन दिवसांपूर्वीच कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यांना कोणत्याही प्रकारचं दुःख झेलावं लागलं नाही. त्यांचं पूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत आहे याचं समाधान त्यांना जातेवेळी होतं.' अँड्रू यांच्या निधनानंतर त्यांचे चाहते दुःखात आहेत.
काजोल आणि न्यासाला कोरोना झाल्याच्या चर्चा, अजय देवगणनं ट्विटरवरून सांगितलं सत्य