मुंबई, 6 मे : बिग बॉसचा 13 वा सीझन संपला आणि पुढच्या सीझनची तयारी सुद्धा सुरू झाली मात्र 13 व्या सीझनची सुपरहिट जोडी सीडनाझ म्हणजे सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाझ गिल यांच्या नावाची चर्चा मात्र अद्याप संपायचं नाव घेत नाही आहे. या दोघांनीही या शोमधू प्रेक्षकांच्या मनात स्वतःची वेगळी जागा निर्माण केली. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या एवढी पसंतीत उतरली होती की त्यावेळी हे दोघंही एंटरटेन्मेंटमधील सर्वांधिक चर्चेत असणारा टॉपिक बनले होते. पण आता पुन्हा एकदा या जोडीची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या दोघांचा एक रोमँटिक व्हिडीओे समोर आला आहे जो खूप व्हायरल होत आहे.
बिग बॉस 13 नंतर शहनाझ गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांनी भुला दूंगा या अल्बम साँगमध्ये काम केलं होतं. त्यांचं हे गाणं सुद्धा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. पण आता लॉकडाऊनमध्ये घरी बसलेल्या शहनाझला अचानक या गाण्याची आणि सिद्धार्थच्या मैत्रीची आठवण झाली आणि तिनं या गाण्याचा एक बिहाइंड द सीन व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
शहनाझनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये या दोघांची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. हे दोघंही एका बाथटबच्या बाजूला बसलेले पाहायला मिळत आहे. त्यांच्या आजूबाजूला कॅन्डल लावण्यात आल्या आहेत. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ-शहनाझची सिझलिंग केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनमुळे सिडनाझच्या चाहत्यांनी मागच्या बऱ्याच काळापासून या दोघांना एकत्र पाहिलेलं नाही त्यामुळे हा व्हिडीओे त्यांच्यासाठी एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नाही.
(संपादन- मेघा जेठे)