शहनाझ गिलचा हा व्हिडीओ व्हिडीओ जर्नलिस्ट मानव मंगलानी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शहनाझ म्हणते, चीनच्या लोकांनी हे जे काही केलं आहे ना त्यासाठी मी त्यांना एकच सांगू इच्छिते. खरं तर मला सांगायचं नाही मला त्यांना ताकीदचं द्यायची आहे. यानंतर ती चायनीज भाषेत बोलताना दिसत आहे. अर्थात हा एक फनी व्हिडीओ आहे मात्र तिच्या चाहत्यांना तिचा हा अंदाज सुद्धा आवडत आहे. संजय दत्तची पहिली पत्नी दिसायची एवढी सुंदर, मुलगी त्रिशालानं शेअर केला PhotoView this post on Instagram
काही दिवसांपूर्वी स्पॉटबॉय-ईला दिलेल्या एका मुलाखतीत शहनाझनं बिग बॉसच्या घरातील अनेक गुपितं उलगडली होती. ती म्हणाली, 'जेव्हा मी मुझसे शादी करोगेचा प्रोमो पाहिल्या तेव्हा मला त्यात काही खास वाटलं नाही. तुम्ही असं म्हणू शकता की मी जर त्या शोमध्ये सहभागी झाले नसते तर मी बिग बॉस जिंकण्याची शक्यता जास्त होती. अगदीच नाही तर मी उपविजेता तर नक्कीच झाले असते. मी हा शो केल्यानंतर अनेक लोकांना मी गमावलं ज्यांनी मला वोट दिले होते. मी हा शो साइन करायला नको होता.' सलमान खानकडून राष्ट्रवादी नेत्याच्या फिटनेसचं कौतुक, VIDEO पाहून व्हाल थक्क
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss, Coronavirus