राखी सावंतचा 'या' प्रतिष्ठित पुरस्कारानं सन्मान, नेटिझन्सनी विचारलं 'विकत घेतलास का?'

राखी सावंतचा 'या' प्रतिष्ठित पुरस्कारानं सन्मान, नेटिझन्सनी विचारलं 'विकत घेतलास का?'

बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

  • Share this:

मुंबई, 13 मे : बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळेला तिनं कोणताही पब्लिसिटी स्टंट केलेला नाही किंवा कोणतंही वादग्रस्त विधान केलेलं नाहीत. राखी सावंतला नुकतेच प्रतिष्ठित दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बेस्ट आयटम नंबर डान्सरसाठी राखीला या पुरस्काराने गौरवण्यात आले. हा प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारल्यानंतर राखीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर दुसरीकडे तिला सोशल मीडियावर नेटिझन्सकडून प्रचंड ट्रोलदेखील केलं जात आहे. तर काही जणांनी तिला मिळालेल्या पुरस्कारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

वाचा :Kabir Singh Trailer- 'तेरे लिए कुछ भी कर सकता हूं... तेरे में मेरे जैसा पागलपन है तो...'

दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन पुरस्कार मिळाल्याचे फोटो राखीनं सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर चाहत्यांनी तिचं तोंडभरून अभिनंदन केलं. तर काही जणांनी 'राखी, तू हा पुरस्कार विकत घेतलास का?' अशी विचारणा करत तिला ट्रोल केलं.

वाचा :सनी लिओनीने 'या' एका अटीवर साइन केलेले सहा पॉर्न सिनेमे

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

वाचा :1.5 कोटींचं फक्त जिम, शाहरुख- अमिताभ यांच्यापेक्षाही दुप्पट महाग गाडी वापरतो हा सुपरस्टार

पाकिस्तानी झेंड्यासोबत राखीचा फोटो

काही दिवसांपूर्वीच कॉन्ट्रोवर्सी क्वीन राखी सावंत तिच्या सोशल मीडियावरील एका फोटोमुळे वादात सापडली होती. या फोटोमध्ये राखीच्या हातात पाकिस्तानचा झेंडा दिसत होता. 'मी माझ्या भारत देशावर खूप प्रेम करते, पण हा माझा 'धारा 370' या सिनेमातील लुक आहे', असं कॅप्शन तिनं फोटोला दिलं होतं. या सिनेमासाठी राखीनं पाकिस्तानी झेंडा हातात घेतल्याचं दिसत आहे. या फोटोवरून राखीला नेटिझन्सनी प्रचंड ट्रोल केलं.

या फोटोवरून अनेक वादविवाददेखील झाले. एका युजरनं लिहिलंय, 'तू पाकिस्तानची नागरिक म्हणून परफेक्ट आहेस. मिस राखी 'पाकिस्तानी' सावंत.' तर जहरीली गर्ल नावाच्या एका युजरनं, 'पैशांसाठी शत्रू देशाचा झेंडा हातात घेशील का ? विश्वासघातकी मुली.' अशी कमेंट केली आहे.

निकालाआधी राज ठाकरेंचा मोदींवर घणाघात, पाहा UNCUT पत्रकार परिषद

First published: May 13, 2019, 6:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading