मुंबई, 22 फेब्रुवारी : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. मग ती तिची फॅशन स्टाईल असो वा तिचं काम. प्रियंकाची नेहमीच चर्चा असते. प्रियंका पु्न्हा एकदा चर्चेत आली आहे ती तिच्या नव्या रेकॉर्डमुळे. प्रियंकाने चोप्रा जोनस हिने आपल्या नावावर आणखी एक नवा रेकॉर्ड केला आहे. आणि हा रेकॉर्ड आहे इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फ़ॉलोअर्स असण्याचा. प्रियंकाचे इन्स्टाग्रामवर 50 मिलियनहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत.
इन्स्टाग्रामवर एवढे फॉलोअर्स केवळ 2 भारतीयांचे आहेत. प्रियंका चोप्राच्या आधी भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीचे काही दिवसांपूर्वी 50 मिलियनहून अधिक फॉलोअर्स होते. आता विराटचे इन्स्टाग्रामवर 50.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.
इन्स्टाग्रावर भारतीयांच्या लिस्टमध्ये विराट कोहली, प्रियंका चोप्रा जोनस आणि दीपिका पादुकोणचा नंबर येतो. दीपिकाचे इन्स्टाग्रामवर आतापर्यंत 44.3 फॉलोअर्स आहेत. त्यासोबतच इन्स्टाग्रावर कमाई करण्यामध्ये प्रियंका चोप्र 19व्या स्थानी आहे. तर विराट कोहली 23व्या स्थानी आहे.
2019 साली इन्स्टाग्रामने आपली रिच लिस्ट जाहीर केली होती. यामध्ये प्रियंका चोप्रा आणि विराट कोहली अशा दोन भारतीयांनी जागा मिळवली होती. याच लिस्टच्या माध्यमातून इन्स्टाग्रामवर कोण किती कमाई करतं याचीही माहिती मिळाली आहे. प्रियंका चोप्रा इन्स्टाग्रामवर प्रत्येक पोस्टमागे आपल्या स्पॉन्सरकडून 2 लाख 71 हजार डॉलर चार्ज करते. तर विराट कोहली आपल्या स्पॉन्सरकडून प्रत्येक पोस्टमागे 1 लाख 96 हजार डॉलर घेतो.
नुकतीच प्रियंका ग्रॅमी अॅवॉर्डच्यावेळी तिच्या डीप नेकच्या ड्रेसमुळे ट्रोल झाली होती. प्रियंकाचा तो ड्रेस बघून नेटकऱ्यांनी प्रियंकाला खूप ट्रोल केलं होतं. प्रियंकाला या ड्रेसमुळे निगेटिव्ह कमेंट्स मिळाल्या होत्या.