सिंगर धोनी तुम्ही पाहिलात का? सोशल मीडियावर VIDEO VIRAL

सिंगर धोनी तुम्ही पाहिलात का? सोशल मीडियावर VIDEO VIRAL

सोशल मीडियावर सध्या महेंद्र सिंह धोनीचा गाणं गातानाचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 04 डिसेंबर : भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी मागच्या काही काळापासून दूर आहे. पण तरीही त्याच्या नावाची चर्चा मात्र काही ना काही कारणाने होतच असते. नुकतीच धोनी आणि त्याची पत्नी साक्षीनं त्यांच्या काही जवळच्या मित्रमंडळींना स्पेशल पार्टी दिली. या पार्टीचे काही इनसाइड फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात धोनी त्याच्या मित्रांसोबत मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. या पार्टीतील एका व्हिडीओची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे ज्यात धोनी गाणं गाताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये धोनी हातात माइक घेऊन ‘जब कोई बात बिगड जाए...’ हे गाणं गाताना दिसत आहे. या गाण्यातील एक कडवं गाताना त्यातील दुसऱ्याच ओळीत धोनीचा सूर बिघडलेला दिसून येतो. पण तरीही त्याचा हा अंदाज त्याच्या चाहत्यांच्या पसंतीत उतरला आहे. माहीचा सूर जरी बिघडला तरी त्याचा आवाज खूप चांगला आहे हे त्याच्या गाण्यावरुन दिसून येतं.

विवाहित दिग्दर्शकाच्या प्रेमात होत्या आशा पारेख, या कारणासाठी तोडलं ठरलेलं लग्न

माहीनंतर त्याचा एक मित्र सुद्धा हे गाणं गाण्याचा प्रयत्न करतो. पण तो असं काही गातो की तिथं उपस्थित असलेल्या सर्वांनाच हसू आवरणं कठीण जातं. या व्हिडीओमध्ये सर्वच त्याच्यावर हसताना दिसत आहेत. इतकंच नाही तर तो स्वतः सुद्धा हसू लागतो.

धोनीच्या रांचीतील घरी झालेल्या या पार्टीला त्याची पत्नी साक्षीच्या मैत्रिणी म्हणजेच प्रोड्युसर नीती आणि प्रीती सिमोन तसेच प्रसिद्ध पंजाबी सिंगर जस्सी गिल सुद्धा उपस्थित होते. या पार्टीमध्ये सर्वच मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत.

Jayeshbhai Jordaar : नव्या सिनेमातील रणवीर सिंहचा हटके लुक रिलीज

माही सध्या क्रिकेटपासून दूर आहे. जुलैमध्ये इंग्लंड विरुद्ध झालेल्या वन डे वर्ल्डकपमधून भारतीय संघ सेमीफायनलमध्येच बाहेर पडला. त्यानंतर धोनी एकही सामना खेळलेला नाही. तो वेस्ट इंडिज दौऱ्यात नव्हता. तसेच त्यानंतर झालेल्या द. आफ्रिका आणि बांग्लादेश विरुद्धच्या सीरिजमध्येही तो खेळला नव्हता.

अक्षय कुमारला कपिल शर्माचं ओपन चॅलेंज; म्हणाला, हिम्मत असेल तर...

Published by: Megha Jethe
First published: December 4, 2019, 5:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading