'कमल हसन यांनी मला जबरदस्तीनं KISS केलं होतं', अभिनेत्री रेखा यांचा आरोप

'कमल हसन यांनी मला जबरदस्तीनं KISS केलं होतं', अभिनेत्री रेखा यांचा आरोप

रेखा यांनी या सिनेमाचं शूटिंग केलं त्यावेळी त्या अवघ्या 16 वर्षांच्या होत्या.

  • Share this:

मुंबई, 26 फेब्रुवारी : सिनेसृष्टीत काम करणं अभिनेत्रींसाठी वाटतं तेवढं सोपं नसतं. अनेकदा त्यांना वाईट अनुभवांना सामोरं जावं लागतं. अभिनेत्री रेखा यांनाही त्याच्या सिने करिअरच्या सुरुवातील अशाच काहीशा अनुभवाला सामोरं जावं लागलं होतं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रेखा यांनी अभिनेता कमल हसन यांच्यावर धक्कादायक आरोप केला आहे. एक सिनेमाच्या शूटिंग दरम्यान कमल हसन यांनी रेखा यांना जबरदस्तीनं किस केल्याचा खुलासा रेखा यांनी केला. मात्र या रेखा बॉलिवूड नाही तर साऊथ अभिनेत्री आहेत.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रेखा यांनी 1986 मध्ये रिलीज झालेल्या बालचंदर यांच्या ‘पुन्नागै मन्नन’ या सिनेमाच्या शूटिंगचा अनुभव शेअर केला. त्या म्हणाल्या, ‘कमल हसन यांनी मला न सांगता किस केलं होतं. कमल हसन आणि बालचंदर यांनी याची योजना आधीच बनवली होती. मात्र त्याबद्दल मला काहीही माहित नव्हतं. हे स्क्रीप्टमध्येही नव्हतं. पण त्यांनी हे केलं. त्यानंतर सिनेमाचे दिग्दर्शक मला येऊन म्हणाले यात अश्लील असं काही नाही. आम्हाला फक्त एका कपलमधील प्रेम आणि भावना दाखवायच्या होत्या.’

VIDEO : रागानं लाल झाली सारा अली खान, म्हणाली; माझ्या बॉयफ्रेंडशी...

रेखा यांनी या सिनेमाचं शूटिंग केलं त्यावेळी त्या अवघ्या 16 वर्षांच्या होत्या. 10 वी परिक्षा देऊन त्या सिनेमाच्या शूटिंगसाठी आल्या होत्या. त्यात एक सीन होता ज्यात हे प्रेमी आत्महत्या करण्यासाठी जातात आणि आत्महत्या करण्याआधी नायक नायिकेला किस करतो. हा सीन शूट झाल्यानंतर रेखा यांना भीती होती की त्यांचे वडील जेव्हा हा सिनेमा पाहतील तेव्हा त्यांच्यावर रागावतील. रेखा सांगतात या घटनेमुळे पुढचे अनेक दिवस त्यांनी भीत-भीत काढले.

स्टार अभिनेता लग्नानंतर दुसरीसोबत राहिला रिलेशनशिपमध्ये आणि तिसरीच्या...

रेखा म्हणाल्या, ‘हा सीन शूट झाल्यानंतरही त्या सिनेमाचे दिग्दर्शक बालाचंदर आणि अभिनेता कमल हसन यांनी माझी कधीच माफी मागितली नाही.’ सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये रेखा खूपच शांत दिसत आहेत मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. लोकांनी याला लैंगिक शोषणाचा दुसरं रुप म्हटलं आहे. सोशल मीडियावर कमल हसन यांनी रेखा यांची माफी मागावी अशी मागणी केली जात आहे.

वरुण धवन आहे अब्जावधींचा मालक, वाचा किती आहे त्याची एकूण संपत्ती

First published: February 26, 2020, 1:26 PM IST

ताज्या बातम्या