मुंबई, 23 जून : सुशांत सिंह राजपूतच्या (Sushan Singh Rajput)निधनानंतर सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडमधील घराणेशाहीवरून वाद सुरू आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी बॉलिवूडमध्ये घराणेशाही मोठ्या प्रमाणात असल्याचं मान्य सुद्धा केलं आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या या नेपोटीझमच्या वादात सर्वच स्टार किड्स युजर्सच्या निशाण्यावर आहेत. अशात सोनम कपूरनं फादर्स डेला केलेलं ट्वीट सुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. तिनं या ट्वीटमध्ये असं काही लिहिलं की सोशल मीडियावर तिला पुन्हा एकदा ट्रोल केलं जात आहे. एवढंच नाही तर टीव्ही अभिनेत्री हिना खानचा बॉयफ्रेंड रॉकी जैस्वालनं तिला सोशल मीडियावरचं सुनावलं आहे.
सोनम कपूरनं फादर्स डे एक ट्वीट केलं होतं. ज्यात तिनं लिहिलं, आज फादर्स डे मी एक गोष्ट सांगू इच्छिते, हो मी माझ्या वडीलांची मुलगी आहे. त्यांच्यामुळेच मी इथे आहे आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे. यात मला कोणत्याही प्रकारचा अपमान वाटत नाही. माझ्या वडीलांना खूप मेहनतीनं आम्हाला या ठिकाणी आणून ठेवलं आहे. हे माझं कर्म आहे की मी त्यांच्या घरात जन्मला आले. मला मी माझ्या वडीलांची मुलगी आहे याचा अभिमान आहे.
गायिका नेहा कक्कर म्हणाली- 'काळजी करू नका, मी मरणार नाही फक्त...'
Today on Father’s Day id like to say one more thing, yes I’m my fathers daughter and yes I am here because of him and yes I’m privileged. That’s not an insult, my father has worked very hard to give me all of this. And it is my karma where I’m born and to whom I’m born. I’m proud
— Sonam K Ahuja (@sonamakapoor) June 21, 2020
सोनमच्या या ट्वीटवर अनेक युजर्सनी तिला ट्रोल केलं आहे. एवढंच नाही तर टीव्ही अभिनेत्री हिना खानचा बॉयफ्रेंड रॉकी जैस्वालनं सुद्धा सोनमच्या या ट्वीटवर तिला सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यानं लिहिलं, अच्छा तर आता प्रत्येकाचं असं म्हणणं आहे की, त्यांना आता बॉलिवूडमध्ये मिळत असलेलं काम हे घराणेशाहीमुळे नाही तर ते आता ज्या ठिकाणी आहेत ते केवळ त्याच्या मागच्या जन्मातल्या कर्माचं फळ आहे. यावरून मी त्यांच्या पुढच्या जन्माचा विचार करूच शकतो की या सर्वांचा पुढचा जन्म किती चांगला असणार आहे. सोनम कपूर, सन्मानपूर्वक मला तुमच्याकडून चांगल्या गोष्टीची अपेक्षा होती पण तुम्ही यात तुमच्या वडीलांच्या नावाचा वापर केलात.
So, every individual who’s been denied d opportunity they deserved bcoz of #Privileges n #Nepotism deserved it for their ‘Karma’ in thr past life? By that logic, I can’t begin to imagine ur next life @sonamakapoor ! Respectfully M’am, I expected better frm U given ur fathers BG https://t.co/KBJfRjXc9T
— ROCKY (@JJROCKXX) June 21, 2020
आणखी एका ट्वीटमध्ये रॉकीनं लिहिलं, तसं बघायला गेलं तर हे नवे विचारचं जगाचा कॉस्मिक बॅलन्स खराब करतात. त्यामुळेच एक गरीब रस्त्यावर राहतो कारण एक श्रीमंत लोक त्याच्यासोबत असं वागतात. जे स्वतःला प्रत्येक गोष्टीत सक्षम मानतात आणि चुकीचं वागल्यावर मग त्याला आता कर्माचं नाव देत आहेत. चला तुम्ही सत्य स्वीकारलं शेवटी. मॅडम तुमच्या विचारांचं मला कौतुक आहे आणि मी तुमचा खूप सन्मान करतो.
Btw this western version of a sacred cosmic balance is d reason why d poor r left in this country on d roads by d rich, privileged n powerful. Justifying cruelty in d name of ‘Karma’ by d high, mighty n powerful.Thumbs up for accepting ur reality n respect ur opinion otherwise!✌🏽
— ROCKY (@JJROCKXX) June 21, 2020
सुशांतच्या निधनानंतर कंगना रणौतनं बॉलिवूडमध्ये असेलेल्या घराणेशाहीवर टीका केली होती. या घराणेशाहीमुळे डिप्रेशनमध्ये जाऊन सुशांतनं आत्महत्या केल्याचं तिनं म्हटलं होतं. तिचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून करण जोहर, सलमान खान यांच्यावर खूप टीका झाली आणि त्यांना बॉयकॉट करण्याची मागणी सुद्धा होत आहे.
...जेव्हा करणसमोर कृती सेननने केलं होतं सुशांतचं कौतुक, पाहा VIDEO
कोण आहे ही मरीना कुंवर? जिच्या VIDEO ची सोनू निगमने भूषण कुमारला दिली धमकी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Hina khan, Sonam Kapoor