मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /कोरोनावर आधारित शॉर्टफिल्म C+ रिलीज, पाहा संक्रमण रोखण्यासाठी काय करावं लागेल

कोरोनावर आधारित शॉर्टफिल्म C+ रिलीज, पाहा संक्रमण रोखण्यासाठी काय करावं लागेल

या शॉर्ट फिल्ममध्ये कोरोना आणि त्यामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दैनंदिन जीवनातल्या झालेल्या बदलांवर भाष्य करण्यात आलं आहे.

या शॉर्ट फिल्ममध्ये कोरोना आणि त्यामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दैनंदिन जीवनातल्या झालेल्या बदलांवर भाष्य करण्यात आलं आहे.

या शॉर्ट फिल्ममध्ये कोरोना आणि त्यामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दैनंदिन जीवनातल्या झालेल्या बदलांवर भाष्य करण्यात आलं आहे.

मुंबई, 12 मे : कोरोना व्हायरसवर आधारित C+ ही शॉर्ट फिल्म Gazebo Entertainment नं रिलीज केली आहे. या शॉर्ट फिल्मचं दिग्दर्शन हर्षवर्धन व्यास आणि सुबोध पांडे यांनी केलं आहे. तर कथा सुबोध आणि मृदुल पांडे यांची आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये कोरोना आणि त्यामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दैनंदिन जीवनातल्या झालेल्या बदलांवर भाष्य करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमध्ये शूट केलेल्या या शॉर्ट फिल्ममध्ये अत्यंत कमी रिसोर्स वापरण्यात आले आहेत. मात्र ही फिल्म लोकांपर्यंत आपला संदेश पोहाचवण्यात यशस्वी ठरली आहे.

विशेष म्हणजे देशात मागच्या 24 तासांत कोरोना संक्रमण प्रचंड प्रमात वाढलेलं पाहायला मिळालं आहे. सध्या देशात 67 हजार पेक्षा जास्त लोक या व्हायरसनं संक्रमित आहेत. तर 2 हजार पेक्षा जास्त लोकांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे हे संक्रमण रोखण्यासाठी आपण नेमकं काय करायला हवं हे या शॉर्टफिल्ममध्ये सांगण्यात आलं आहे.

" isDesktop="true" id="452837" >

तसेच देशात लॉकडाऊन सध्या तरी पूर्णपणे हटवलं जाणार नाही. पण काही प्रमाणात सूट देण्याचे संकेत देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, पहिल्या तीन टप्प्यात जे उपाय करण्यात आले त्याची चौथ्या टप्प्यात फारशी गरज नाही. याशिवाय त्यांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून या व्हायरसबाबत राजकीय सल्ले मागितले आहेत. ज्यात या व्हायरसचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्र्याचं नियोजन कसं आहे यावर ते चर्चा करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांसोबत कोरोना व्हायरसच्या सद्य स्थितीवर विस्तृत चर्चा केली. याशिवाय देशाची आर्थिक घडी नीट बसवण्याची काय नियोजन करावं याबाबतही चर्चा झाल्या. 25 मार्चपासू सुरू असलेलं हे लॉकडाऊन 17 मे ला संपणार आहे. कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी हे लॉकडाऊन करण्यात आलं आहे.

लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडली प्रियांका चोप्रा, Photo शेअर करुन म्हणाली...

शाहरुखची ऑनस्क्रीन मुलगी BOLDNESS च्या बाबतीत देतेय बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर

First published:
top videos

    Tags: Bollywood