राखी सावंतच्या 'नकली पती'ला मेट्रोमध्ये महिलांनी बदडलं VIDEO व्हायरल

राखी सावंतच्या 'नकली पती'ला मेट्रोमध्ये महिलांनी बदडलं VIDEO व्हायरल

प्रकरण हातघाईवर आलं आणि लोकांनी त्यांना बदडून काढलं. ज्या तरुणीला त्यांनी विरोध केला तिलाच थप्पड मारायलाही लोकांनी सांगितलं.

  • Share this:

नवी दिल्ली 13 नोव्हेंबर : बॉलीवुडची आयटम गर्ल राखी सावंत (Rakhi Sawant) आपल्या लग्नाबद्दल कायम चर्चेत राहते. तिचा पती कोण आहे याबद्दल तिने गुढ निर्माण केलंय. त्यामुळे त्याची कायम चर्चा होत असते. राखीचा नकली पती' पती असणाऱ्या दीपक कलाल यांना दिल्लीत मेट्रोमध्ये महिलांनी चांगलीच अद्दल घडवली. ते प्रवास करत असताना नेहमीप्रमाणे त्यांनी ड्रामेबाजी केली मात्र यात ते फसले आणि महिलांनी त्यांना चांगलाच प्रसाद दिला. दीपक कलाल हे आपल्या ड्रामेबाजीचे व्हिडीओ कायम आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून शेअर करत असतात आणि त्याला प्रतिसादही चांगलाच मिळतो. त्यामुळे त्यांची ओळखही निर्माण झाली. ते दिल्लीत मेट्रोतून प्रवास करत असताना एका मुलीने त्यांना ओळखलं आणि ती त्यांच्यासोबत सेल्फी घेऊ लागली.

भोजपुरी अभिनेत्रिने शेअर केला बाथटबमध्ये स्नान करतानाचा VIDEO व्हायरल

ती सेल्फी घेत असताना दीपक यांनी तिला विरोध केला. न विचारचा सेल्फी घेतल्याने ते नाराज झाले. त्यांनी आपली नाराजी व्यक्तही केली. लोकांना हा सुरुवातीला पब्लिसीटी स्टंट वाटला. मात्र हे प्रकरण जरा जास्तच चिघळलं.

ते विरोध करत असताना आजुबाजूचे प्रवासी गोळा झाले आणि त्यांना दीपक यांना विरोध केला. प्रकरण हातघाईवर आलं आणि लोकांनी त्यांना बदडून काढलं. ज्या तरुणीला त्यांनी विरोध केला तिलाच दीपक यांना थप्पड मारायलाही लोकांनी सांगितलं आणि तिने त्यांना थप्पडही मारली. आता हा व्हिडीओ व्हायरल होतोय.

First published: November 13, 2019, 11:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading