मुंबई, 07 डिसेंबर : टीव्ही मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मधून सर्वांची मनं जिंकणारी अभिनेत्री हिना खाननं ‘कसौटी जिंदगी की 2’मध्ये तिची ‘संस्कारी बहू’वाली इमेज पुसून टाकली. या मालिकेत तिनं साकारलेलं कोमोलिका हे खलनायिकेचं पात्र विशेष गाजलं. त्यानंतर आता हिना लवकरच वेब सीरिजच्या माध्यामातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘डॅमेज 2’ या वेब सीरिजमधून हिना डिजिटल डेब्यू करणार आहे. या वेब सीरिजमध्ये ती अभिनेता अध्ययन सुमनसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.
डॅमेज 2 ही एक सस्पेन्स थ्रिलर कथा आहे. ही वेब सीरिज हंगामा प्लेवर 14 जानेवारीला रिलीज होणार आहे. यात हिना खान एका गेस्ट हाऊसच्या मालकीनीच्या भूमिकेत दिसणार आहे. वेब सीरिजच्या सुरुवातीला सर्व काही ठिक असतं मात्र नंतर अचानक घरातली एक लहान मुलगी गायब होते. या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला. ज्यात हिना खूपच वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. पण ही वेब सीरिज मर्डर मिस्ट्री आहे की हॉरर स्टोरी हे अद्याप समजलेलं नाही.
'मी प्रेग्नन्ट असेन तर...', पत्रकारच्या प्रश्नावर दीपिका पदुकोण भडकली
टीव्ही मालिका असो किंवा मग रिअलीटी शो हिनानं नेहमीच बेस्ट परफॉर्मन्स दिला आहे. या वेब सीरिजच्या ट्रेलरमध्येही हिना खूपच बोल्ड आणि इंप्रेसिव्ह लुकमध्ये दिसत आहे. या वेब सीरिजच्या पहिल्या पार्टमध्ये मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर मुख्य भूमिकेत दिसली होती. यातील तिच्या अभिनयाचं कौतुकही झालं होतं. त्यामुळे आता हिना तिच्या अभिनयाची कमाल दाखवण्यात यशस्वी ठरते की नाही हे येत्या काळात समजेलच.
अभिनेत्रीचा खुलासा, ‘65 वर्षीय प्रोड्युसरनं मला कपडे उतरवण्यास सांगितलं'
VIDEO : नेहा पेंडसेनं लग्नात घेतला असा भन्नाट उखाणा की, ऐकून नवराही लाजला मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.