सनी लियोनीने केला 'लैला मैं लैला' गाण्यावर बोल्ड डान्स, Video Viral

सनी लियोनीने केला 'लैला मैं लैला' गाण्यावर बोल्ड डान्स, Video Viral

सनी लियोनीच्या जीवनावर एक बायोपिकही तयार झाला असून तिने तिच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी त्यात उघड केल्या आहेत.

  • Share this:

मुंबई 8 नोव्हेंबर : बॉलीवूड अभिनेत्री (Bollywood Actress) सनी लियोनी (Sunny Leone) बोल्ड आणि बिनधास्त फरफॉमन्ससाठी ओळखली जाते. ती तिच्या सोशल मीडिया हँडल्सवरून कायम  बिनधास्त फोटो आणि व्हिडीओज पोस्ट करत असते. सनी सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असून तिचे Instagramवर हजारो फॉलोअर्स आहेत. सनीने तिच्या Instagramवर शहारुख खानच्या 'रईस' चित्रपटातल्या एका गाण्याचा व्हिडीओ पोस्ट केलाय. रईस मधलं  'लैला मैं लैला' हे गाणं गाजलं असून त्या गाण्याची ती रिहर्सल करत असल्याचा तो व्हिडीओ आहे. प्रेक्षकांनीही त्याला चांगलीच पसंती दिलीय.

मुंबईत हॉटेलमध्ये भांडे धुणाऱ्या मुलाला Indian Idolने बनवलं स्टार!

सनी या व्हिडीओत आपल्या टीम बरोबर डान्स करतेय. पांढरी क्रॉप-टॉप आणि काळी पँट घातलेली सनी या कपड्यांमध्ये सुंदर दिसतेय. या व्हिडीओच्या शेवटी ती अनेक भाषांमध्ये नमस्कारही म्हणत असल्याचं दिसतेय. बॉलिवूडमध्ये उत्तम बस्तान बसवल्यानंतर सनीने आता दक्षिण भारतातल्या चित्रपटसृष्टीत धमाकेदार एन्ट्री केलीय. ती पीरियड्सवर आधारीत असलेल्या 'वीरमादेवी' चित्रपटाच मुख्य भूमिका करणार आहे.

त्याचबरोबर 'कोका कोला' या हॉरर कॉमेडी चित्रपटातही ती अभिनय करणार आहे. सनीने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलंय आणि ती चर्चेतही राहिलीय. तिने शहारुख खानसोबत डान्सही केलाय. त्याचबरोबर ती अनेक वेब सिरीजमध्येही चमकली आहे. तिच्या जीवनावर एक बायोपिकही तयार झाला असून तिने तिच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी त्यात उघड केल्या आहेत. सनीने एक मुलगीही दत्तक घेतलेली आहे. तिच्यासोबतचे फोटोही ता कामय पोस्ट करत असते. अनेक स्टेज शोज आणि इतर कार्यक्रमांमध्येही ती सध्या व्यस्त असून बॉलिवूड आणि टॉलिवूडमधूनही तिला चांगलीच मागणी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2019 11:17 PM IST

ताज्या बातम्या