बिग बींनी शेअर केला 'पुकार'च्या सेट वरील फोटो, ओळखा पाहू कोण आहे 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री ?

बिग बींनी शेअर केला 'पुकार'च्या सेट वरील फोटो, ओळखा पाहू कोण आहे 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री ?

1983मध्ये रिलीज झालेल्या 'पुकार' सिनेमाच्या सेटवरील हा फोटो शेअर करत अमिताभ यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

  • Share this:

मुंबई, 18 मे :  बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. एकीकडे ते ट्विटरवर अनेक ट्वीट करताना दिसतात. तर दुसरीकडे अनेकदा इन्स्टाग्रामवरही ते वेगेवगळे फोटो शेअर करताना दिसतात. त्यांनी एक जुना फोटो नुकताच त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. ज्यात बॉलिवूडमधील सध्याची प्रिसिद्ध अभिनेत्री दिसत आहे. 1983मध्ये रिलीज झालेल्या 'पुकार' सिनेमाच्या सेटवरील हा फोटो शेअर करत अमिताभ यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

अमिताभ यांनी हा फोटो शेअर करताना लिहिलं, 'ओळखा पाहू कोण आहे ही मुलगी ? गोवा मध्ये 'पुकार' सिनेमाच्या शूटिंगच्यावेळी सेटवर उपस्थित असलेली ही बेबी गर्ल करीना कपूर आहे. ती इथं तिचे वडील रणधीर कपूर यांच्यासोबत आली होती आणि अचानक तिच्या पायांना दुखापत झाली. तुमचा लाडका अभिनेता तिला औषध लावत आहे.' अमिताभ यांचा हा सिनेमा सुपरहिट झाला. हा सिनेमा रिलीज झाला त्यावेळी करीना फक्त 3 वर्षांची होती.

अमिताभ बच्चन लवकरच अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र'मध्ये दिसणार आहेत. या सिनेमात रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्याही मुख्य भूमिका आहेत. याशिवाय अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. 'चेहरे' या सिनेमात अमिताभ आणि इम्रान एकत्र दिसणार आहेत. या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवातही झाली आहे. तर करीना कपूरही अक्षय कुमार सोबत 'गुडन्यूज' तर इरफान खानसोबत 'अंग्रेजी मीडियम'मध्ये दिसणार आहे. अक्षय आणि करीनाचा 'गुडन्यूज' येत्या 27 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

Cannes 2019 : हिना खान ड्रेसवरून ट्रोल झाल्यावर भडकला सलमान खान

Cannes 2019 - ‘अजून राहत जा रणवीर सिंगसोबत...’ दीपिकाच्या या लुकवर नेटकऱ्यांनी केले भन्नाट कमेंट

First published: May 18, 2019, 3:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading