आराध्याच्या बर्थडे पार्टीचे PHOTO VIRAL, 'या' कारणानं ट्रोल झाली ऐश्वर्या

आराध्याच्या बर्थडे पार्टीचे PHOTO VIRAL, 'या' कारणानं ट्रोल झाली ऐश्वर्या

ऐश्वर्या-अभिषेकनं नुकताच त्यांची मुलगी आराध्याचा 8 वा वाढदिवस साजरा केला.

  • Share this:

मुंबई, 21 नोव्हेंबर : सोशल मीडियाच्या या युगात सध्या ट्रोलिंग हा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आहे. विशेषतः बॉलिवूड कलाकार याची सर्वात जास्त शिकार होतात. कधी मेकअप तर कधी ड्रेसच्या मुद्द्यावरुन त्यांना ट्रोल केलं जातं. पण आता या ट्रोलिंगची शिकार फक्त बॉलिवूड स्टार्स नाही तर त्यांची मुलंही होऊ लागली आहेत. यात ऐश्वर्या राय-बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्याचं नाव आवर्जुन घ्यावं लागते. कारण स्टार किड्स ट्रोल होण्यामध्ये आराध्या सर्वात पुढे आहे.

ऐश्वर्या-अभिषेकनं नुकताच त्यांची मुलगी आराध्याचा 8 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसच्या पार्टीमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यावर झालेली ही पार्टी पूर्णतः खासगी स्वरुपाची होती. पण या पार्टीचे काही इनसाइड फोटो समोर आले आहेत ज्यामुळे आराध्या बच्चनला ट्रोल केलं जात आहे. याचं कारण आहे ते या फोटोंमध्ये आराध्याच्या चेहऱ्यावर दिसलेला मेकअप.

'हॉट' आणि 'बोल्ड' सीनही वाचवू शकले नाही या अभिनेत्रींचं करिअर

 

View this post on Instagram

 

#abhishekbachchan #aishwaryarai & birthday girl #aaradhyabachchan had fun with "jhula" 😊☺️

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

आराध्या बच्चनच्या वाढदिवसाचा एक फोटो समोर आला आहे ज्यात ऐश्वर्या, अभिषेक आणि आराध्या आकाशपाळण्यात बसलेले दिसत आहेत. या फोटोमध्ये आराध्याच्या चेहऱ्यावर मेकअप दिसल्यानं एवढ्या कमी वयात मेकअप केल्याच्या मुद्द्यावरुन आराध्याला ट्रोल केलं जात आहे. इन्स्टाग्रामवर काही युजर्सनी एवढ्या कमी वयात आराध्याला मेकअप करण्याला विरोध केला आहे. तर काहींनी लिहिलं, ऐश्वर्याची मुलगी एवढी लहान आहे मग ती तिला मेकअप का लावते हेच समजत नाही.

थलायवा आता झाला Pride Icon Of India! महानायकाच्या सन्मानाचा सुपर VIDEO

मेकअपमुळे ट्रोल होण्याची आराध्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही आकाश अंबानी-श्लोका मेहता यांच्या लग्नातही मेकअपमध्ये दिसल्यानं आराध्यावरुन ऐश्वर्याला नेटकऱ्यांना सुनावलं होतं. याशिवाय कोणत्याही इव्हेंटमध्ये आईला चिकटून राहणाऱ्या आराध्या आणि आपल्या मुलीचा हात न सोडणाऱ्या ऐश्वर्याला नेटकऱ्यांनी ओव्हर प्रोटेक्टीव्ह म्हटलं होतं. याच गोष्टीमुळे तिला ट्रोलही व्हावं लागलं होतं.

असा ही अवलिया; 16 वर्षात सर्व चित्रपट ब्लॉकबस्टर, एकही फ्लॉप नाही!

=====================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2019 10:48 AM IST

ताज्या बातम्या