Home /News /entertainment /

सार्वजनिक ठिकाणी पतीसोबत इंटिमेट झाली अभिनेत्री, व्हायरल होतोय असा VIDEO

सार्वजनिक ठिकाणी पतीसोबत इंटिमेट झाली अभिनेत्री, व्हायरल होतोय असा VIDEO

सार्वजनिक ठिकाणी या अभिनेत्रीनं असं काही केलं की तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

  मुंबई, 21 फेब्रुवारी : हॉलिवूड अभिनेत्री किम कर्दाशियन तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. ती नेहमीच स्वतःचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. लाइमलाइटमध्ये राहण्याची कोणतीही संधी किम अजिबात सोडत नाही. पण नुकतच तिनं सार्वजनिक ठिकाणी असं काही केलं की तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. किम कर्दाशिअन आणि तिचा पत्नी सार्वजनिक ठिकाणी इंटिमेंट झालेले दिसत आहेत. हा सर्व तिथल्या कॅमेरामध्ये शूट झाला. किम आणि तिचा पती केनी वेस्ट यांचा लिफ्टमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. सलमान नेहमीच काळे कपडे का घालतो? डिझायनरनं सांगितलं सिक्रेट किम आणि केनी एका मॉलमध्ये शॉपिंगसाठी गेले होते. त्यावेळी दोघंही शॉपिंग दरम्यान एन्जॉय करताना दिसले. तिथून निघताना ते लिफ्टमधून येत होते. यावेळी अचानक या दोघांनी लिफ्टमध्येच एकमेकांना किस करायला सुरुवात केली. ही लिफ्ट ट्रान्सपरंट असल्यानं त्याच्या चाहत्यांनी लगेचच याचा व्हिडीओ शूट केला. लिफ्ट थांबल्यावर बाहेर पडताना केनी थोडासा गडबडला मात्र किम बिनधास्त अंदाजात दिसली. तिनं शॉपिंग बॅग उचलल्या आणि ती निघून गेली. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर काही वेळातच हीट झाला. FILMFARE नामांकनाबद्दल यामीने अखेर सोडलं मौन, शेअर केलं खुलं पत्र
  View this post on Instagram

  Kanye 😂😂

  A post shared by Hit Up Ange Australia (@hitupangeaus) on

  किमनं हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये किम एका खूपच बोल्ड आणि कलरफुल स्किनी टाइट ड्रेसमध्ये तर केनी ब्लॅक जॅकेट ब्राऊन ट्राऊझरमध्ये दिसत आहेत. केनीनं यासोबतच ब्लॅक सनग्लासेस कॅरी केले आहेत. या व्हिडीओवरुन एक गोष्ट मात्र स्पष्ट होते. कोणत्याही ठिकाणी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी हे दोघंही मागेपुढे पाहत नाहीत. रणबीरच्या आईचा TikTok डेब्यू, 'COOL आजी'चा नातीबरोबरचा VIDEO VIRAL
  View this post on Instagram

  JPG & KFC

  A post shared by Kim Kardashian West (@kimkardashian) on

  याशिवाय किमनं शॉपिंग लुक आणि मॉलमधील काही फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. या मॉलचं नाव JPG आहे. काही दिवसांपूर्वी बोल्ड फोटोशूटमुळे किम कर्दाशियन खूप चर्चेत आली होती. तिने तिचे बिकिनी फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिचे हे फोटो पति केनी वेस्टनं क्लिक केले होते.
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Hollywood, Kim kardashian

  पुढील बातम्या