सोनमच्या लग्नात एका कोपऱ्यात बसून रणवीर कोणाच्या आठवणीत बुडाला ?

सोनम कपूर आणि आनंद आहुजाच्या लग्नाच्या रिसेप्शनला रणवीर सिंगच्या डान्सने चार चाँद लावले. मात्र याच रिसेप्शन दरम्यानचे रणवीरचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहेत.

Renuka Dhaybar | Updated On: May 11, 2018 09:01 AM IST

सोनमच्या लग्नात एका कोपऱ्यात बसून रणवीर कोणाच्या आठवणीत बुडाला ?

11 मे : सोनम कपूर आणि आनंद आहुजाच्या लग्नाच्या रिसेप्शनला रणवीर सिंगच्या डान्सने चार चाँद लावले. मात्र याच रिसेप्शन दरम्यानचे रणवीरचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहेत.

या फोटोमध्ये रणवीर हॉटेलच्या पायरीवर एकटाच बसलेला दिसतोय. तसंच रणवीर या फोटोत मोबाईलमध्ये काहीतरी करत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे तो असा एकटाच कोणाच्या आठवणींमध्ये बुडाला आहे, अशा चर्चांना उधाण आलं आहे.

रणवीरच्या या फोटोवरुनच तो कोणाला तरी मिस करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात. एवढंच काय तर रणवीरला त्याची गर्लफ्रेंड दीपिका पदुकोणची आठवण तर येत नाही ना असा प्रश्न चाहत्यांकडून विचारला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 11, 2018 09:01 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close