मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

News18 लोकमतने महाराष्ट्रासमोर आणलेल्या गायक मुलाला अजय अतुलनं दिली संधी; 'या' सिनेमासाठी गाणं रेकॉर्ड

News18 लोकमतने महाराष्ट्रासमोर आणलेल्या गायक मुलाला अजय अतुलनं दिली संधी; 'या' सिनेमासाठी गाणं रेकॉर्ड

अजय अतुल चंद्रा व्हायरल साँग बॉय जयेश खरे

अजय अतुल चंद्रा व्हायरल साँग बॉय जयेश खरे

News18 लोकमतने महाराष्ट्रासमोर आणलेला गायक मुलगा जयेश खरेला अजय अतुलनंं दिली संधी. नव्या सिनेमासाठी गाणं देखील रेकॉर्ड केलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 26 सप्टेंबर : काही दिवसांआधी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या शाळेत चंद्रमुखी सिनेमातील 'चंद्रा' हे गाणं गाणाऱ्या मुलाला आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. न्यूज 18 लोकमतनं पहिल्यांदा जयेशचा व्हिडीओ महाराष्ट्रासमोर आणला होता. त्यानंतर जयेश खरे या शाळकरी मुलाचं हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं. जयेशनं त्याच्या खणखणीत आवाजानं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. सर्वत्र जयेशचं कौतुक होत आहे.  एका व्हायरल व्हिडीओमुळे जयेशनं नशीब उजळलं आहे. अस्सल मातीतला हा कलाकार थेट प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय अतुल पर्यंत पोहोचला. अजय अतुल यांनी नुकतीच जयेशची भेट घेतली. नुसतीच भेट नाही तर जयशेकडून एका आगामी सिनेमासाठी एक गाणं देखील रेकॉर्ड करून घेतलं आहे. जयेशला मिळालेल्या या यशाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

व्हायरल व्हिडीओमुळे अजय अतुल यांना भेटलेल्या जयेशनं आगामी 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमासाठी एक गाणं रेकॉर्ड केलं आहे. अभिनेता अंकुश चौधरीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. महाराष्ट्राच्या मातीतले दिग्गज लोककलावंत शाहिर साबळे यांच्या आयुष्यावर आधारीत महाराष्ट्र शाहीर या सिनेमासाठी गाणं गाण्याचं भाग्य जयेश खरे याला लाभलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील छोट्याशा खेडेगावात राहणाऱ्या जयेशवर महाराष्ट्राच्या लोककलावंतांचे आशिर्वाद आहेत असं म्हणायला हरकत नाही.

हेही वाचा - आपल्या गाण्याने महाराष्ट्राला वेड लावलेल्या जयेशचं बदललं आयुष्य, Video Viral झाल्यानंतर अशी आहे परिस्थिती

अभिनेता अंकुश चौधरी यानं महाराष्ट्र शाहीर सिनेमासाठी जयेशचा गाणं रेकॉर्ड करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात अजय अतुल जयेशला गाणं शिकवताना दिसताना. 'अस्सल मातीतला कलाकार व्हायरल व्हिडीओने सापडतो. आणि थेट अजय अतुल यांच्यापर्यंत पोहोचतो. महाराष्ट्र शाहीर या सिनेमासाठी त्याचं गाणं रेकॉर्ड होतं. इतिहास असाच लिहिला जातो', असं महाराष्ट्र शाहीरच्या संपूर्ण टीमकडून म्हटलं गेलं आहे.

जयेशला मिळालेलं हे यश पाहून सगळेच त्याचं कौतुक करत आहेत. जयेशच्या आवाजातलं गाणं ऐकण्यासाठी प्रेक्षकांना मात्र 23 एप्रिलची 2023ची वाट पहावी लागणार आहे. महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा 23 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

First published:

Tags: Marathi cinema, Marathi entertainment, Video viral, Viral news