Home /News /entertainment /

Kitchen Kallakar : आदित्य घेऊन येणार त्याच्या आयुष्यातली खरी सई,पाहायला मिळणार प्यारवाली केमिस्ट्री!

Kitchen Kallakar : आदित्य घेऊन येणार त्याच्या आयुष्यातली खरी सई,पाहायला मिळणार प्यारवाली केमिस्ट्री!

झी मराठीवरील 'किचन कल्लाकार' (Kitchen Kallakar) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. या किचनमध्ये विविध क्षेत्रातीला मंडळीनी आतापर्यंत हजेरी लावली आहे.

  मुंबई, 27 एप्रिल- झी मराठीवरील 'किचन कल्लाकार' (Kitchen Kallakar) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. या किचनमध्ये विविध क्षेत्रातीला मंडळीनी आतापर्यंत हजेरी लावली आहे. किचनमध्ये यांची कशी तारांबळ उडते हे आपण या शोच्या माध्यमातून पाहिलचं आहे. आता 'किचन कल्लाकार'च्या आगामी भागात अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas kulkarni) आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole) हजेरी लावताना दिसणार आहेत. लवकच ही दोघं लग्नगाठ बांधणार आहेत. त्यापूर्वीच ही जोडी जोडीनं किचनमध्ये कलाकारी दाखवताना दिसणार आहेत. किचन कल्लाकार हा कार्यक्रम कमी काळात प्रेक्षकांच्यात लोकप्रिय झाला आहे. या शोमध्ये आतापर्यंत राजकीय मंडळी असतेल एक मनोरंजन विश्वातील लोकप्रिय चेहरे यांनी हजेरी लावली आहे. नेहमी पडद्यावर वावरणारे हे कलाकार खऱ्या आयुष्य़ात किचनमध्ये कसं काम करतात, त्यांचा वावर कसा असतो याचा अनुभती या शोच्यामाध्यमातून सर्वांना पाहता आली आहे. आता आगामी एपिसोडमध्ये प्रेक्षकांना विराजस आणि शिवानी यांच्यातली धमाल केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. तसेच, त्यांची लव्हस्टोरी जाणून घ्यायला मिळणार आहे. विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळेे(Virajs Kulkarni Shivani Rangole Wedding) लवकरच लग्न करणार आहेत. त्यामुळे हा एपिसोड आणखी खास ठरणार आहे. वाचा-देशमुख कुटुंब आणि अरुंधती येत आहेत जवळ मात्र अभिनं घेतला मोठा निर्णय मराठी मनोरंजनसृष्टीतील क्यूट कपल म्हणून विराजस कुलकर्णी (Virajs Kulkarni) आणि शिवानी रांगोळे (Shivani Rangole) यांना ओळखलं जातं. या दोघांनी कधीच आपलं नातं कुणापासून लपवलेलं नाही. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी साखरपुडा केला होता. चाहत्यांना या दोघांच्या लग्नाबद्दल उत्सुकता लागली होती. 7 मे 2022 ला ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. वाचा-'चंद्रा'ची माधुरी दीक्षितला भुरळ, 'चंद्रमुखी'चं पोस्टर शेअर करत म्हणाली.. 'डावीकडून चौथी बिल्डिंग' या विराजसच्या नाटकात शिवानीनं अभिनय केला होता. तेव्हाच त्यांची ओळख झाली. विराजसनं 'होस्टेल डेज' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. विराजस फक्त अभिनेता नाही तर तो एक दिग्दर्शकही आहे. 'अनाथेमा' या नाटकात त्यांनं अभिनयाबरोबर दिग्दर्शनाचीही जबाबदारी स्वीकारली होती. तसंच रमा माधव चित्रपटासाठी मृणाल कुलकर्णी यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होत. याशिवाय मिकी, डावीकडून चौथी बिल्डिंग, भंवर यासारख्या काही नाटकांचं लेखन आणि दिग्दर्शनही त्याने केलं आहे.
  'थेटर ऑन एंटरटेनमेंट' ही विराजसची निर्मिती संस्था असून त्याने अनेक नाटकांची निर्मिती देखील केली आहे.तर ‘बनमस्का’ मालिकेमुळे शिवानी रांगोळे हे नाव घराघरांत पोहोचलं. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. त्यामध्ये 'सांग तू आहेस ना' ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा’ या प्रमुख मालिकांचा समावेश आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या