मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

HBD: ‘आम्हाला कोरोनापासून वाचवं’; वीर दासनं केला देवाला फोन, पाहा VIDEO

HBD: ‘आम्हाला कोरोनापासून वाचवं’; वीर दासनं केला देवाला फोन, पाहा VIDEO

‘आमचे पंतप्रधान म्हणाले देव सर्वत्र आहे’; पाहा वीर दासनं देवाशी केलेलं हे भन्नाट संभाषण

‘आमचे पंतप्रधान म्हणाले देव सर्वत्र आहे’; पाहा वीर दासनं देवाशी केलेलं हे भन्नाट संभाषण

‘आमचे पंतप्रधान म्हणाले देव सर्वत्र आहे’; पाहा वीर दासनं देवाशी केलेलं हे भन्नाट संभाषण

  मुंबई 31 मे: कोरोनाचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतचं चाललं आहे. (Coronavirus) या वाढत्या संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी सरकारनं लॉकडाउनचा पर्याय स्विकारला. मात्र अद्याप आपण या प्राणघातक विषाणूला रोखू शकलेलो नाही. सध्या देशात लसीकरण मोहीस सुरु झाले आहे. मात्र दररोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळं अता लसींचा देखील तुटवडा जाणवू लागला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत मनुष्य प्राण्याला वाचवण्यासाठी अभिनेता वीर दासनं (Vir Das) चक्क देवालाच फोन केला. ऐकून तुम्हाला नक्कीच थोडं विचित्र वाटेल पण हा व्हिडीओ पाहा. आज वीर दासचा वाढदिवस आहे. (Vir Das calling to God) त्याच्या 42 व्या वाढदिसाच्या निमित्तानं हा व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. स्टँडअप कॉमेडियन म्हणून करिअरची सुरुवात करणारा वीर आज बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. तो आपल्या सेंस ऑफ ह्युमर आणि जबरदस्त टाईमिंगनं प्रेक्षकांना चकित करतो. यावेळी देखील त्यानं कोरोनाचं निमित्त साधून असंच आश्चर्य चकित करणारं टाईमिंग साधलं आहे. त्यानं थेट देवालाच फोन केला. तर मग पाहुया देवाशी फोनवर बोलताना त्यानं नेमकं काय मागितलं? राम गोपाल वर्मांना पुन्हा आठवला ‘सत्या’; शेअर केले 23 वर्ष जुने फोटो
  View this post on Instagram

  A post shared by Vir Das (@virdas)

  वीरनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यानं देवाशी बोलत असतानाचं एक स्किट सादर केलं आहे. अर्थात हे एक विनोदी स्किट आहे. यामध्ये तो फोन करतो पण त्याचा फोन देवाचा सहाय्यक उचलतो. सर्वप्रथम वीर कोण आहे? ही कुठल्या ब्रम्हांडामधील पृथ्वी आहे? यांसारखे प्रश्न त्याला विचारतो. त्यानंतर वीर पृथ्वीवरील कोरोनाची समस्या समजावून सांगतो. यावर तो देवाचा असिस्टंट म्हणतो ही तुमच्या पापाची फळ आहेत. तुम्हाला इथंच भोगावी लागतील. वीरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Coronavirus, Entertainment

  पुढील बातम्या