ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना अनंतात विलीन, 'दयावान'ला निरोप देण्यास लोटलं बाॅलिवडू

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना अनंतात विलीन, 'दयावान'ला निरोप देण्यास लोटलं बाॅलिवडू

  • Share this:

27 एप्रिल : ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना अनंतात विलीन झाले आहेत. त्यांच्या पार्थिवावरभावपूर्ण वातावरणात मुंबईतील वरळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

विनोद खन्ना यांचं दीर्घ आजाराने आज  निधन झालंय. गेले अनेक दिवस ते कर्करोगाने आजारी होते. सकाळी 11:20 वाजता त्यांनी मुंबईच्या रिलायन्स हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. संध्याकाळी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी अंत्ययात्रेत सहभागी झाली होती. बाॅलिवडूचा शहेनशहा अमिताभ बच्चन, रणधीर कपूर, ऋषी कपूर, सुभाष घई, रणदीप हुड्डा, अभिषेक बच्चन, दीया मिर्झा, रणजीत, उदीत नारायण आदी कलाकार सहभागी झाले होते. तसंच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हेही उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2017 07:45 PM IST

ताज्या बातम्या