मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /विनोद खन्ना आणि फिरोज खानची भांडणं; रात्री मारामारी सकाळी मागितली माफी, 110 कोटींचा झाला फायदा

विनोद खन्ना आणि फिरोज खानची भांडणं; रात्री मारामारी सकाळी मागितली माफी, 110 कोटींचा झाला फायदा

विनोद खन्ना आणि फिरोज खानमध्ये झाली होती कडाक्याची भांडणं

विनोद खन्ना आणि फिरोज खानमध्ये झाली होती कडाक्याची भांडणं

जिवाला जीव देणारे मित्र एक दिवस एकमेकांचे वैरी झाले होते. दोघांमध्ये मारामारी होण्याइतकी भांडणं झाली. पण या भांडणाचा फायदा हा तब्बल 110 कोटी रुपये होता. काय आहे हा किस्सा पाहूयात.

मुंबई, 25 मे : बॉलिवूडमध्ये मैत्रीचं दुसरं नाव जय-वीरू आहेत असं म्हटलं जातं. सिनेमातील दोघांचे किस्से फार प्रसिद्ध आहेत. पण ऑफस्क्रिन जय-वीरूची जोडी अमिताभ धर्मेंद्र नाही तर अभिनेते विनोद खन्ना आणि फिरोज खान यांची होती. 70 च्या दशकात या जोडीनं मोठ्या पडद्यावर हंगामा केला होता. एकमेकांच्या सुख, दुख: दोघे एकमेकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असायचे. पण तुम्हाला माहिती आहे का हेच जिवाला जीव देणारे मित्र एक दिवस एकमेकांचे वैरी झाले होते. दोघांमध्ये मारामारी होण्याइतकी भांडणं झाली.  पण या भांडणाचा फायदा हा तब्बल 110 कोटी रुपये होता. काय आहे हा किस्सा पाहूयात.

बॉलिवूडमध्ये रात्रीच्या पार्ट्यांचा जुना इतिहास आहे. मोठे डायरेक्टर प्रोड्यूसर त्यांना वाटेल तेव्हा पार्ट्यांचं आयोजन आजही करतात. अभिनेते फिरोज खान अशा पार्ट्यांचे शौकिन होते. त्यांनी एके दिवशी असंच एक गेट -टू-गेदर ठेवलं होतं. रात्री बॉलिवूड स्टारची मैफिल रंगणार होती. मीडिया रिपोर्टनुसार, या पार्टीत सगळे कलाकार आणि मित्र मैत्रिणी आपल्या पत्नी आणि मुलांसह आले आले होते. अभिनेते विनोद खन्ना त्यांची पत्नी गीतांजलीबरोबर पार्टीला आले होते. पार्टीत खाण्या-पिण्याची सोय होती. सोबतच नाच-गाणी देखील सुरू होती.

हेही वाचा - गाऊन घालून गावात फिरतेय हेमांगी; म्हणाली, कपड्यांवरून कुणाची मापं...

पार्टी सुरू असताना फिरोज खान यांनी विनोद खन्ना यांच्या बायकोचा हात पकडून तिला नाचण्यासाठी फोर्स केला. दोघांची चांगली मैत्री होती पण त्या पार्टीत फिरोज खान दारू प्यायले होते त्यामुळे गींताजलीनं त्यांच्याबरोबर डान्स करण्यास नकार दिला. पण नाही म्हणूनही फिरोज खान यांनी गींताजलीला डान्स करण्यासाठी फोर्स केला.

गींताजलीला फरोज खान जबरदस्ती डान्स करण्यासाठी नेतोय हे पाहून विनोद खन्ना भडकले. त्यांनी फिरोज खानला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र फिरोज खान नशेत असल्याने त्यांना काहीच कळत नव्हतं. विनोद खन्ना चांगलेच संतापले आणि आणि रागाच्या भरात फरोज खानच्या तोंडावर जोरात मुक्का मारला. दोघांची भांडणं पाहून रंगलेली पार्टी तिथेच थांबली. विनोद खन्नाला बायकोला घेऊन तिथून निघून गेले.

हेही वाचा -  20 वर्षांनी मोठे विनोद खन्ना अन् माधुरीचा तो किसिंग सीन

दुसऱ्या दिवशी सकाळी रात्री झालेल्या पार्टीचा संपूर्ण गोंधळ फिरोज खान यांना कळला. त्यांना या गोष्टीची फार लाज वाटली. ते विनोद खन्नाच्या घरी गेले आणि दोघांची माफी मागितली. त्यानंतर ते म्हणाले, "तू इतक्या जोरात मुक्का मारलास की माझ्या संपूर्ण जबडा हललाय. पण ठीक आहे यामुळे मला माझ्या सिनेमाचा हिरो मिळाला".  त्यावेळेस फिरोज खान कुर्बानी सिनेमावर काम करत होते. सिनेमासाठी त्यांना एँग्री यंग मॅनची गरज होती. त्यांनी बिग बींना मुख्य भूमिकेसाठी निवडलं होतं. पण बिग बींच्या तारखा मिळत नसल्याने फिरोज खाननी विनोद खन्ना यांना मुख्य भूमिकेसाठी रिप्लेस केलं.

1980मध्ये आलेल्या 'कुर्बानी' सिनेमात पहिल्यांदा मर्सिडिज गाडी वापरण्यात आली होती. सिनेमात जबरदस्त अँक्शन सीन्स होते. सिनेमा त्यावेळी सगळीकडे हाऊसफुल होता.  फिरोज खाननं बंगळूरमध्ये तिकिट खिडकीवर नोटा मोजण्यासाठी माणसं बसवली होती असं म्हणतात. सिनेमानं 110 कोटींची कमाई केली होती.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News