S M L

जेव्हा विनोद दुआ अक्षय कुमारवर भडकतात

स्टार प्लसचा सुपरहिट शो 'दि ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'चा सुपर जज आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार असं काही बोलला की त्याने तो वादात अडकला आहे.

Sonali Deshpande | Updated On: Oct 26, 2017 07:07 PM IST

जेव्हा विनोद दुआ अक्षय कुमारवर भडकतात

26 आॅक्टोबर : स्टार प्लसचा सुपरहिट शो 'दि ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'चा सुपर जज आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार असं काही बोलला की त्याने तो वादात अडकला आहे.त्याचं झालं असं की शोच्या दरम्यान अक्षयने कॉमेडियन मल्लिका दुआवर एक विनोद केला आणि तो मल्लिकाच्या वडिलांना म्हणजेच प्रसिद्ध पत्रकार विनोद दुआ यांना खटकला. यावर ते अक्षयवर चांगलेच भडकले आहेत. विनोद यांनी अक्षय कुमारच्या टिप्पणीवर आक्षेप घेतला आहे.

ते म्हणाले की त्याने माझ्या मुलीसाठी खूप अश्लील आणि आक्षेपार्ह शब्द वापरलेले आहेत, जे मी सहन करू शकत नाही. अक्षयची अश्लील भाषा दाखवण्यासाठी  दुवा यांनी  शोची एक व्हिडिओ  क्लिप शेअर केली आहे. ज्यामध्ये कलाकार श्याम रंगीला यांच्या परफॉर्मन्सनंतर अक्षयने मल्लिकावर टिपण्णी केली. याच ओळींवर विनोद यांनी आक्षेप व्यक्त केला आहे.

विनोद दुआ म्हणाले की, 'आपल्यासोबत काम करणाऱ्याशी असे अश्लील बोलणे ही आहे अक्षय कुमारची भाषा आणि त्याचं ज्ञान...स्टार प्लस जरा जागे व्हा.' खरं तर कलाकार श्याम रंगीलाने नरेंद्र मोदी यांचा अभिनय केला होता. या शोचा नियम आहे की जो सगळ्यांना पोट भरुन हसवेल त्याच्यासाठी स्टेजवर जाऊन मोठा घंटा वाजवला जातो. अक्षयने घंटा वाजवण्यासाठी मल्लिका दुआला स्टेजवर बोलवलं होतं. याच वेळेस इतर टीम मेंबर झाकिर आणि हुसेन दलालही तिथे उपस्थित होते. मल्लिका ती घंटा वाजवत होती त्यावर अक्षयने आक्षेपार्ह टिप्पणी केली.पण जरी ते एवढे भडकले असले तरी त्यांनी त्यांची पोस्ट डिलीट केली आहे. त्यामुळे आता यावर अक्षयची काय प्रतिक्रिया असेल हेच बघणं उत्सुकतेचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 26, 2017 07:05 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close