मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'आजोबा उत्तर देतील का?',विलासराव देशमुखांच्या स्मृतिदिनी नातवंडांनी सर्वांनाच केलं भावुक

'आजोबा उत्तर देतील का?',विलासराव देशमुखांच्या स्मृतिदिनी नातवंडांनी सर्वांनाच केलं भावुक

आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि आपल्या सासऱ्यांच्या 10 व्या स्मृतीदिनानिमित्त जेनेलियाने पोस्ट लिहत सर्वानांच भावुक केलं आहे.

आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि आपल्या सासऱ्यांच्या 10 व्या स्मृतीदिनानिमित्त जेनेलियाने पोस्ट लिहत सर्वानांच भावुक केलं आहे.

आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि आपल्या सासऱ्यांच्या 10 व्या स्मृतीदिनानिमित्त जेनेलियाने पोस्ट लिहत सर्वानांच भावुक केलं आहे.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 14 ऑगस्ट-   बॉलिवूडमधील 'क्युट कपल' अशी रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची ओळख आहे. हे दोघेही सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. रितेश आणि जेनेलिया जितकं आपल्या व्यवासायिक आयुष्याबाबत चर्चेत असतात. तितकंच ते आपल्या खाजगी आयुष्यामुळेसुद्धा लक्ष वेधून घेतात. आपल्या प्रत्येक महत्वाच्या क्षणी ते सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसतात. आजही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि आपल्या सासऱ्यांच्या 10 व्या स्मृतीदिनानिमित्त जेनेलियाने पोस्ट लिहत सर्वानांच भावुक केलं आहे. जेनेलिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सोबतच अभिनेत्री आपले फॅमिली फोटोही शेअर करत असते. रितेश आणि जेनेलिया यांना दोन मुले आहेत. रियान आणि राहिल अशी त्यांची नवे आहेत. अभिनेत्री सतत आपल्या मुलांसोबत धम्माल मस्ती करतांना दिसून येते. परंतु आज या चिमुकल्यांनी सर्वांनाच इमोशनल केलं आहे. जेनेलियाने आपल्या इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिची दोन्ही मुले आपल्या आजोबांच्या फोटोजवळ हात जोडून बसलेली दिसून येत आहेत. आज विलासराव देशमुख यांचा दहावा स्मृतिदिन आहे. जेनेलिया देशमुख इन्स्टाग्राम पोस्ट- अभिनेत्रीने पोस्टमध्ये लिहलंय, '"प्रिय बाबा, रियान आणि राहिलनं आज मला विचारलं "आई, जर आपण आजोबाला प्रश्न विचारला तर ते उत्तर देतील का?" नि:संशय माझं उत्तर होतं "हो ते उत्तर देतील, जर तुम्ही त्यांचं ऐकलं तर." मी इतकी वर्षे प्रामाणिकपणे त्यांच्याशी बोलत राहिले प्रश्न विचारत राहिले. आणि मला त्यांच्याकडून उत्तरेदेखील मिळाली. मला माहित आहे की ते आमच्या प्रत्येक कठीण काळात आमच्याबरोबर होते आणि आहेत''. (हे वाचा:VIDEO: मलखानचं अपूर्ण 'हे' काम पूर्ण करणार 'अनिता भाभी'; सौम्या टंडनच्या मोहिमेत तुम्हीही होऊ शकता सहभागी ) अभिनेत्रीनं पुढं लिहलंय, ''तसेच ते आमच्या प्रत्येक आनंदामध्ये आमच्यासोबत असतात. मला माहित आहे की तुम्ही आमच्या प्रत्येक शंकांचं निरसन केलं आहे. आणि मला आत्ताही माहित आहे, मी जे काही लिहत आहे ते तुम्ही वाचत आहात. मला आजही आठवत तुम्ही आम्हाला म्हटलं होतं, जर तुम्ही तुमचे कान-डोळे नेहमी उघडे ठेवाल.तर तुम्ही नेहमीच आमच्यासाठी उपलब्ध असाल'. बाबा तुमची खूप आठवण येते'. असं म्हणत अभिनेत्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
First published:

Tags: Bollywood actress, Bollywood News, Entertainment, Instagram post

पुढील बातम्या