येत्या रविवारी इंतजार संपणार, विक्रांत ईशाला सांगणार मनातलं गुपित

सध्या 'तुला पाहते रे' मालिकेत बऱ्याच घडामोडी घडतायत. प्रेक्षक ज्याची वाट पाहतायत तो क्षणही जवळ येऊन ठेपलाय.

सध्या 'तुला पाहते रे' मालिकेत बऱ्याच घडामोडी घडतायत. प्रेक्षक ज्याची वाट पाहतायत तो क्षणही जवळ येऊन ठेपलाय.

  • Share this:
    मुंबई, 5 डिसेंबर : संध्याकाळ झाली की फार पूर्वीच्या काळात तुळशीवृंदावनावर दिवा लावला जातो. तसे आता टीव्हीचं बटन आॅन होतं. नित्यनेमानं मालिका पाहणं सुरू होतं. सध्या 'तुला पाहते रे' मालिकेत बऱ्याच घडामोडी घडतायत. प्रेक्षक ज्याची वाट पाहतायत तो क्षणही जवळ येऊन ठेपलाय. विक्रांत सरंजामे आणि ईशा यांच्या प्रेमाला आता बरेच साक्षीदार झालेत. ईशाला आॅफिसमध्ये राजनंदिनी साड्यांच्या डिपार्टमेंटचं हेड बनवलं जातं. तिच्यावर मोठी जबाबदारी टाकली जाते. ईशासाठी हा मोठा धक्का असतो. ईशाला मदत करण्याची जबाबदारी मायरावर सोपवली जाते. मायरा वरून सगळं आलबेल असल्याचं दाखवत असली, तरीही ती आतून चरफडतेय. ती आताही ईशाचा काटा कसा काढता येईल, याचाच विचार करतेय. ईशाला विक्रांत इतकं महत्त्व का देतोय, हा प्रश्न अनेकांना पडलाय. किंबहुना कुठे तरी पाणी मुरतेय, याचीही जाणीव सगळ्यांना झाली. ईशाचे वडील तिच्यावर नाराज आहेत. पण ते व्यक्त होत नाहीयत. या रविवारी मालिकेचा महाएपिसोड आहे. त्यात विक्रांत ईशाला घरी बोलावतो. तिच्यासाठी घर सजवतो. आणि तिला प्रपोझही करतो. तुला पाहते रे मालिकेचा हा भाग खूप रंजक होणार आहे. यानंतर ईशा-विक्रांतचं वेगळं आयुष्य सुरू होणार आहे. विक्रांतचा भूतकाळही समोर येणार आहे. आता पुढच्या वर्षी म्हणजे जानेवारीत हा मोठा सोहळा पार पडणार आहे. विक्रांत आणि ईशाच्या लग्नाचा बार उडणार आहे. सुरुवातीला निमकर कुटुंबाचा विरोध ईशाला सहन करावा लागणार आहे. पण नंतर ते तयार होणार. सगळे फॅन्स याच क्षणाची वाट पाहतायत. ईशा-विक्रांतचं प्रेम, लग्न या घडामोडी मालिकेत सुरू होतीलच. पण आता विक्रांतचा भूतकाळही समोर येणार आहे. त्याबद्दल ईशाला अजून काहीच कल्पना नाहीय. प्रेक्षकांना धरून ठेवण्यासाठी मालिकेत बऱ्याच गोष्टी घडतील. झी अॅवाॅर्डमध्ये 'तुला पाहते रे' मालिकेनं 9 पुरस्कार पटकावले.  सर्वोत्कृष्ट नायकाचा पुरस्कार विक्रांत सरंजामेनं पटकावला. ईशा म्हणजे गायत्री दातारनं सर्वोत्कृष्ट चेहरा या पुरस्कारावर शिक्कामोर्तब केलंय.सर्वोत्कृष्ट जोडी ठरलीय विक्रांत आणि ईशाची. तर 'तुला पाहते रे' मालिकाला प्रेक्षकांनी जास्त पसंती दिली. Video : 'हा' पाकिस्तानी खेळाडू होता सोनाली बेंद्रेसाठी दिवाना
    First published: