News18 Lokmat

विक्रांत सरंजामे ईशासोबत 'असा' साजरा करणार ख्रिसमस

न्यू इयर आणि ख्रिसमसचे वेध लागलेत. सगळ्यांचे सेलिब्रेशनचे प्लॅन्स सुरू झालेत. त्यात मालिकाही मागे नाहीत. 'तुला पाहते रे'मध्ये विक्रांत सरंजामे आणि ईशाचेही सेलिब्रेशनचे प्लॅन्स सुरू आहेत.

News18 Lokmat | Updated On: Dec 18, 2018 07:30 AM IST

विक्रांत सरंजामे ईशासोबत 'असा' साजरा करणार ख्रिसमस

मुंबई, 18 डिसेंबर : न्यू इयर आणि ख्रिसमसचे वेध लागलेत. सगळ्यांचे सेलिब्रेशनचे प्लॅन्स सुरू झालेत. त्यात मालिकाही मागे नाहीत. 'तुला पाहते रे'मध्ये विक्रांत सरंजामे आणि ईशाचेही सेलिब्रेशनचे प्लॅन्स सुरू आहेत.


विक्रांत सरंजामे ख्रिसमस सेलिब्रेशनला आपण जाऊ, असं सांगतो. ईशा लगेचंच तयार होते. ईशाच्या आई-वडिलांना मात्र ईशावर डाऊट आहे. ते काही न बोलता या दोघांचा पाठलाग करायचं ठरवतात. आणि तसा करतातही.


विक्रांत ईशाला घेऊन अशा टिकाणी येतो, की सगळ्यांना धक्काच बसतो. दोघांना रंगेहाथ पकडायचा प्लॅन करणारे ईशाचे बाबाही चकित होतात. विक्रांत ईशाला घेऊन वृद्धाश्रमात येतो. तिथल्या वृद्धांबरोबर केक कापून दोघं ख्रिसमसचं सेलिब्रेशन करतात. सगळीकडे आनंद पसरवतात.

Loading...


विक्रांत सरंजामेनं ईशाला प्रपोझ केलं ते अगदी रोमँटिक पद्धतीनं. हेलिकाॅप्टरमधून त्यानं ईशाला फेरफटका मारवला. वरून जमिनीवर 'ईशा आय लव्ह यू' असं फुलांनी लिहिलेलंही ईशानं पाहिलं. तिच्या आयुष्यातला हा मोठा क्षण.


त्याच वेळी टिल्लूनी दिलेल्या माहितीनुसार ईशाचे वडीलही कर्जतच्या बंगल्यावर पोचले. ईशा आणि विक्रांतला एकत्र पाहून त्यांना धक्का बसला. तेव्हापासून ते अस्वस्थच आहेत. ईशाशी नीट बोलत नाहीत. गुरुचरित्राचं पारायण करायला बसलेत. अधेमधे टिल्लू येऊन त्यांचे कान भरतोच आहे.


इकडे विक्रांत सारखा ईशाला सांगतोय, तू घरी सांग. पण ईशाचा धीरच होत नाहीय.  पण येत्या दोन आठवड्यात ही परिस्थिती बदलणार आहे. ईशाच्या मदतीला विक्रांतच येणार आहे. ईशाला आपल्या आई-वडिलांना सांगणं जमत नाहीय पाहून तोच घरी येऊन लग्नाबद्दल बोलणार आहे.


जानेवारीत मालिकेत विक्रांत आणि ईशाच्या लग्नाचा बार उडणार आहे. ईशा-विक्रांतचं प्रेम, लग्न या घडामोडी मालिकेत सुरू होतीलच. पण आता विक्रांतचा भूतकाळही समोर येणार आहे. त्याबद्दल ईशाला अजून काहीच कल्पना नाहीय. प्रेक्षकांना धरून ठेवण्यासाठी मालिकेत बऱ्याच गोष्टी घडतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 18, 2018 07:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...