मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

विक्रांत सरंजामे ईशावरचं प्रेम व्यक्त करणार? 'तुला पाहते रे'मध्ये उलगडणार राज

विक्रांत सरंजामे ईशावरचं प्रेम व्यक्त करणार? 'तुला पाहते रे'मध्ये उलगडणार राज

'तुला पाहते रे' मालिकेत आता उत्कंठा शिगेला पोचलीय.  येत्या रविवारी या मालिकेचा एक तासाचा भाग आहे.

'तुला पाहते रे' मालिकेत आता उत्कंठा शिगेला पोचलीय. येत्या रविवारी या मालिकेचा एक तासाचा भाग आहे.

'तुला पाहते रे' मालिकेत आता उत्कंठा शिगेला पोचलीय. येत्या रविवारी या मालिकेचा एक तासाचा भाग आहे.

मुंबई, 16 आॅक्टोबर : विक्रांत सरंजामे आणि ईशा यांची प्रेमकहाणी अजून फारसा आकार घेत नाहीय. वेळोवेळी ईशानं आपलं प्रेम विक्रांतसमोर व्यक्तही केलंय. पण तो काही त्याच्या मनाचा थांगपत्ता लावू देत नाहीय. 'तुला पाहते रे' मालिकेत आता उत्कंठा शिगेला पोचलीय.  येत्या रविवारी या मालिकेचा एक तासाचा भाग आहे.

गेल्या आठवड्याच्या टीआरपी रेटिंगमध्ये ही मालिका नंबर दोनवर होती, तर माझ्या नवऱ्याची बायको नंबर एकवर होती. पहिल्या पाचमध्ये झीच्याच मालिका आहेत. त्यामुळे अंतर्गत स्पर्धांनाही त्यांना तोंड द्यावं लागतं. म्हणूनच रविवारचा हा महाएपिसोड असावा.

या भागात ईशा विक्रांतला विचारते, 'तुम्ही प्रेम का मान्य करत नाहीत?' यावर विक्रांतचं उत्तर असं की मला जे वाटतं ती आपुलकी आहे. या मनाच्या कल्लोळातून बाहेर पडण्यासाठी विक्रांत ईशाला त्याच्या जवळच्या सहकाऱ्याच्या सांगण्यावरून प्रमोशन देतो. तो ईशाला बंगलोरला पाठवायचा निर्णय घेतो. ईशाला त्याचा या मागचा हेतूही कळतो.

ईशा आता ईरीलाच पेटलीय. ती विक्रांतला सांगते, पुढच्या चोवीस तासात आपण एकमेकांसमोर आलो, तर तुमचंही माझ्यावर प्रेम आहे, असं मी समजेन. मालिकांमध्ये नेहमीच योगायोगांना संधी असते. तसा याही वेळी होणार आहे.

ईशा आपल्या आईवडिलांबरोबर कर्जतच्या देवीला जाते, त्याच वेळी विक्रांतही त्याच्या आईला घेऊन त्याच देवीच्या दर्शनाला येतो. विक्रांत ईशाला पाहतो आणि लपतो. पण तरीही देवीमाता या दोघांना समोरासमोर आणणारच. रविवारच्या महाएपिसोडमध्ये हाच सस्पेन्स उलगडणार आहे.

'तुला पाहते रे' ही मालिका सध्या तुफान गाजतेय. सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिका साकारत आहे. ईशा आणि विक्रांत सरंजामे यांची अनोखी कहाणी सगळ्यांच पसंत पडत आहे.

विक्रांत सरंजामे म्हणजे शहरातील एक मोठा बिझनेसमन. खूप श्रीमंत, आलिशान घर असलेला विक्रम आणि दुसरीकडे चाळीत, मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी ईशा निमकर जी अतिशय सामान्य पार्श्वभूमीत वाढली आहे.

पुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक!

First published:

Tags: Esha, Subodh bhave, Tula pahte re, Vikrant saranjame, विक्रांत सरंजामे, सुबोध भावे