S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

विक्रांत सरंजामे-ईशामधलं प्रेम वयातल्या अंतरापेक्षा महत्त्वाचं, म्हणतायत प्रेक्षक

विक्रांत सरंजामे आणि ईशात वयाचं अंतर भरपूर. त्यात ईशा विक्रांतच्या प्रेमात पडलीय. प्रेक्षक याकडे नक्की कसे पाहतायत?

Sonali Deshpande | Updated On: Sep 18, 2018 10:38 AM IST

विक्रांत सरंजामे-ईशामधलं प्रेम वयातल्या अंतरापेक्षा महत्त्वाचं, म्हणतायत प्रेक्षक

मुंबई, 18 सप्टेंबर : सध्या 'तुला पाहते रे' मालिका जास्तीत जास्त पाहिली जातेय. सुबोध भावेचा विक्रांत सरंजामे आणि गायत्रीची ईशा लोकांना जास्त आवडतेय. त्यांच्या आयुष्यात प्रेक्षक गुंतत चाललेत. विक्रांत सरंजामे आणि ईशात वयाचं अंतर भरपूर. त्यात ईशा विक्रांतच्या प्रेमात पडलीय. प्रेक्षक याकडे नक्की कसे पाहतायत?

शिक्षिका असलेल्या माहीमच्या कीर्ती टिळवे यांना हे नातं फारसं काही गैर वाटत नाही. त्यांच्या मते असं होऊ शकतं. प्रेमाच्या नात्यात वयाला फारसं महत्त्व नसतं. विक्रांत हा एकदम आदर्श व्यक्ती आहे. ईशासारख्या वीस वर्षाच्या वयोगटातल्या मुलीला त्याचं आकर्षण वाटू शकतं. त्याचंच रूपांतर पुढे प्रेमात होतं.

अंधेरीत राहणाऱ्या डाॅ. सुप्रिया कारंडे याही ही मालिका पाहतात. त्यांनी सांगितलं, ' वयाचा काही फरक पडत नाही. मॅच्युरिटी महत्त्वाची. लग्नानंतर दोघांचं एकमेकांबरोबर कसं जमतंय, यावरच सगळं अवलंबून असतं.'घर आणि नोकरी सांभाळणाऱ्या वर्षा सदावर्तेंना विक्रम आणि ईशा जवळ येण्यामागे लाॅजिक वाटतंय. त्या म्हणाल्या, विक्रांत तसा एकटाच आहे. त्यामुळे त्याला ईशामध्ये आपलं माणूस दिसायला लागलंय.ईशाच्या साधी राहणी,उच्च विचारसरणीची त्याला भुरळ पडलीय.

स्वत:चा व्यवसाय सांभाळणाऱ्या स्वाती श्रीवास्तवना मात्र दोघांमधलं इतकं मोठं अंतर खटकतंय. त्या दोन व्यक्तिरेखांमध्ये वयातल्या अंतरामुळे पुढे प्राॅब्लेम होऊ शकतो, असं त्यांनी सांगितलं.

वांद्र्याला राहणाऱ्या निलेश लेलेंचं मतही असंच आहे. त्यांच्या मते ईशा तितकी काही साधी वाटत नाही. पुढे विक्रांतच्या आयुष्यात गडबड करू शकते.

तर रसायनीला राहणाऱ्या मधुश्री गानूंनी यामागचं वेगळं कारण सांगितलं. त्या म्हणाल्या, 'ईशा वडिलांच्या खूप जवळ असते. त्यामुळे ती विक्रांतमध्ये फादर फिगर पाहत असते. ती सिक्युरिटी तिला विक्रांतमध्ये तिला सापडते.'

वयातलं हे अंतर कमीजास्त फरकानं स्वीकारणारे हे प्रेक्षक साधारण 40 ते 50 वयोगटातले आहेत. पण एका 20 वर्षाच्या मुलीची प्रतिक्रिया खूपच वेगळी मिळाली.

20 वर्षांची आकांक्षा भेंडे सांगते, ' उंच माझा झोका, एक लग्नाची दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट, दिल दोस्ती दुनियादारी अशा मालिका देणाऱ्या वाहिनीनं तुला पाहते रे मालिका द्यावी का, हाच प्रश्न आहे. विक्रांत आणि ईशाच्या वयातलं अंतर ग्लोरिफाय केलंय. ते काही पटत नाही. शिवाय या स्पर्धेच्या युगात ईशाला सगळ्या गोष्टी कशा सहज मिळतात, हेही पटण्यासारखं नाहीय.' आकांक्षाला ही मालिका काही वास्तववादी वाटत नाहीय.

प्रेक्षक मालिका नित्यनेमानं पाहतात. त्यातल्या व्यक्तिरेखांचं आयुष्य अनेकदा रिलेटही करतात. अनेकदा या मालिका अनेकांसाठी तणाव कमी करण्याचं साधनही असतं.

आता बिग बाॅसच्या घरात पाहायला मिळणार 'या' अभिनेत्रींचा जलवा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 18, 2018 10:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close