Elec-widget

विक्रांत सरंजामे ईशाशिवाय लंडनला जाण्यामागचं काय आहे खरं कारण?

'तुला पाहते रे' मालिकेत विक्रांत सरंजामे लंडनला गेलाय. आठवडाभर तरी सुबोध भावे मालिकेत नसणार. त्यामागचं काय आहे कारण?

  • Share this:

'तुला पाहते रे' मालिकेचा गेल्या आठवड्याचा टीआरपी नंबर वन होता. मालिकेत बऱ्याच घडामोडी घडतायत. विक्रांत सरंजामे हळूहळू त्याचं प्रेम व्यक्त करेल का असे प्रसंग यायला लागलेत.

देवळातला समोरासमोर येण्याचा प्रसंग तर सगळ्यांनी पाहिला. आता अचानक मालिकेत विक्रांत सरंजामे लंडनला निघालाय.

अगोदर ईशाला घेऊनच तो चालला होता. पण वडिलांनी ईशाला पाठवण्याचा नकार दिल्यानंतर विक्रांत एकटाच लंडनला जातोय. म्हणजे थोडे दिवस तो दिसणार नाही.

Loading...

विक्रांत म्हणजेच सुबोध मालिकेतून अचानक गायब व्हायचं कारण काय? कधी कधी कलाकारांच्या काही अडचणींमुळेही कथेत बदल करावा लागतो.

सुबोधचा 'आणि डाॅ. काशिनाथ घाणेकर' सिनेमा येत्या 8 नोव्हेंबरला रिलीज होतोय. सुबोध भावे प्रमोशनमध्ये खूपच बिझी आहे. शूटिंगसाठी त्याच्या तारखा मिळत नाहीत.

'तुला पाहते रे' मालिका ईशा-विक्रांतभोवती आहे. सुबोध उपलब्ध होईपर्यंत विक्रांतला लंडनला पाठवणं गरजेचं होतं.

त्यामुळे आता आठवडाभर तरी ईशा एकटीच किल्ला लढवणार आहे. सुबोध प्रमोशनमधून मोकळा झाला की मग इथे विक्रांत सरंजामे लंडनहून परतेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 4, 2018 11:35 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com