दीपवीरनंतर आता विक्रांत सरंजामे आणि ईशाच्या लग्नाचा उडणार बार

दीपवीरनंतर आता विक्रांत सरंजामे आणि ईशाच्या लग्नाचा उडणार बार

विक्रांत आणि ईशा एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करायला लागलेत. आता प्रेक्षकांना प्रश्न पडलाय की लग्न कधी करणार? आम्हाला लग्नाचा महिना कळलाय.

  • Share this:

मुंबई, 24 नोव्हेंबर : दीपिका-रणवीरचं लग्न तर झालं. प्रियांका-निकचं लग्न डिसेंबरमध्ये आहे. रसिक या लग्नसोहळ्यांचा आनंद तर घेतायत. पण सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे. सगळ्यांचं लक्ष एकाच लग्नाकडे लागलंय.


ते लग्न म्हणजे 'तुला पाहते रे'मधलं विक्रांत सरंजामे आणि ईशाचं. ईशानं आपलं प्रेम तर व्यक्त केलं. पण विक्रांतही उघडपणे ईशाशी प्रेमानं वागतोय. झेंडेंचा विरोध असूनही ईशापर्यंत पोचायला झेंडेच त्याला मदत करतायत.


अगदी घराच्या गच्चीवर अभ्यास करत असलेल्या ईशासाठी नुडल्स बनवण्याचं कामही विक्रांत करतोय. अजून निमकर कुटुंबाला या प्रेमाचा सुगावा लागला नाहीय.


आता पुढच्या वर्षी म्हणजे जानेवारीत हा मोठा सोहळा पार पडणार आहे. विक्रांत आणि ईशाच्या लग्नाचा बार उडणार आहे. सुरुवातीला निमकर कुटुंबाचा विरोध ईशाला सहन करावा लागणार आहे. पण नंतर ते तयार होणार. सगळे फॅन्स याच क्षणाची वाट पाहतायत.


त्रांच्या माहितीनुसार विक्रांत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपलं मन ईशाजवळ मोकळं करणार. तो तिला थेट प्रपोझ करणार. त्या दिवशी महाएपिसोड ठेवणार आहेत. ईशा आणि विक्रांतच्या प्रेमामुळे तिच्या घरच्यांना बसलेला धक्का, आॅफिसमध्येही होणारी हलचल अशा बऱ्याच गोष्टी आता रंगणार आहेत.


ईशा-विक्रांतचं प्रेम, लग्न या घडामोडी मालिकेत सुरू होतीलच. पण आता विक्रांतचा भूतकाळही समोर येणार आहे. त्याबद्दल ईशाला अजून काहीच कल्पना नाहीय. प्रेक्षकांना धरून ठेवण्यासाठी मालिकेत बऱ्याच गोष्टी घडतील.


झी अॅवाॅर्डमध्ये 'तुला पाहते रे' मालिकेनं 9 पुरस्कार पटकावले.  सर्वोत्कृष्ट नायकाचा पुरस्कार विक्रांत सरंजामेनं पटकावला. ईशा म्हणजे गायत्री दातारनं सर्वोत्कृष्ट चेहरा या पुरस्कारावर शिक्कामोर्तब केलंय.सर्वोत्कृष्ट जोडी ठरलीय विक्रांत आणि ईशाची. तर 'तुला पाहते रे' मालिकाला प्रेक्षकांनी जास्त पसंती दिली.


Video : जान्हवी कपूरचा बटरफ्लाय लुक व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 24, 2018 01:01 PM IST

ताज्या बातम्या